पालकांची रील लहान मुलांनाही होते फील.! विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन; ज्ञानार्जनावर परिणाम.

२१ वे शतक समाज माध्यमाने पूर्णपणे आपल्या कवेत घेतले आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे केवळ महाविद्यालयीन तरुण मुलेच नव्हे तर पालक असलेले जेष्ठ नागरिक ही रिल्स च्या विळख्यात गुरफटले आहेत पालकांनाच रील्सचे वेड लागले असल्यामुळे मुलांमध्येही त्याची आकर्षण निर्माण होत आहे यातून शाळकरी विद्यार्थ्यांना शिक्षण, अभ्यास आणि अध्ययनावर विपरीत परिणाम होत आहे
अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा वापर कमालीचा झाला आहे त्यामुळे आपापसातील संवाद कमी झाला आहे साधने वाढली पण संवाद उरला नाही अशी परिस्थिती आहे मग तो मैत्रीतला असो वा नात्यातला संवाद सार्वजनिक ठिकाणी चौकात ग्रामीण भागातील पार येथे चार चौघात ही सर्वजन मोबाईल मध्ये डोके घालून बसलेले असतात प्रत्येकाच्या हातात मोबाईल असते पण काही सेकंदाच्या रिल्स करून ज्येष्ठ नागरिकच नव्हे तर महिलांनाही रिल्स ची भुरळ पडलेली आहे याचा मोठा दूरगामी परिणाम उद्याचे भविष्य असलेल्या शाळकरी मुलांवर होत आहे जो तो ऑनलाइन असतो रिल्स पाहतो आणि त्या काढून पोस्टही करतो बहुतांशी शाळकरी व महाविद्यालयीन तरुण रील्स बनविण्यासाठी बाईक स्टंट, सिगरेट, दारू अशा लक्ष वेधून घेणाऱ्या कृती करीत सोशल मीडियावर लाईक आणि कमेंट मिळवण्यासाठी धडपडत आहेत कारण पालकच रिल्समध्ये गुरुपटलेले असल्याने शाळकरी मुलांना जाब कोणी विचारायचा बंधने कोणी घालायची त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे
केवळ महाविद्यालयीन तरुणच नव्हे तर शाळकरी मुले देखील आठ तासांपेक्षा अधिक वेळ ऑनलाईन राहून दुचाकी व इतर गोष्टीतून रील्स बनवीत असल्यास याचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांचा अभ्यास शाळेतील उपस्थिती अध्ययनावर होत आहे त्यामुळे उद्याचे नागरिक असलेले तरूण आणि विद्यार्थ्यांची पिढी नेमकी कुठे जात आहे त्याचे भविष्य काय असा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रील बनवताना भान ठेवा.!
सोशल मीडियावर रील बनविण्याचे फ्याड सर्वच वर्गातील लोकांमध्ये आहे अनावश्यक प्रसिद्धी व लाईक मिळविण्यासाठी दारू, सिगरेट, बाईक स्टंट करून रिल्स तयार केले जातात याचाच मोह तरुण आणि शाळकरी मुलांना होतो यात पालक ही मागे नाहीत सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी तरुणच नव्हे तर शाळकरी मुले ही व्यस्त असतात याचे मोठे दुष्परिणाम येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार आहेत यामुळे घरातील जेष्ठ मंडळी पालकांनी रील्सबद्दलचा भान ठेवणे गरजेचे आहे ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात समाज माध्यमांतून मुक्ती मिळविण्याचे केंद्र गावागावात आणि शहरातील प्रत्येक गल्लीत उभे करावे लागणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांतून सांगण्यात येत आहे