तोतया पोलिसाकडून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक

(प्रतिनिधी) : तोतयाने पोलीस असल्याचे सांगून तुमच्याकडे गांजा, गुटखा काय आहे ते तपासायचे आहे असे सांगून ज्येष्ठ नागरिकाचे गळ्यातील बदाम, हातातील सोन्याची व तांब्याची अंगठी काढून घेऊन गेल्याची घटना संगेवाडी (ता.सांगोला) येथे 27 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
संगेवाडी (ता. सांगोला) येथील मोतीराम पवार हे 27 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संगेवाडीहुन मेथवड फाटा येथे दवाखान्यात जात होते. त्यावेळी मोतीराम पवार यांना रस्त्याच्या मध्यभागी गाडी उभी करून आम्ही पोलीस खात्यातील स्कोड आहे. तुमच्याजवळ काही गांजा, गुटखा आहे का हे तपासायचे आहे म्हणून गाडीची तपासणी केली. त्यानंतर त्या पोलिसांनी त्या ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील गोफ, बदाम आणि हत्यातील सोन्याची व तांब्याची अंगठी काढून घेतली त्याची पुडी बाधून घेतली. त्यांच्या सोबतच दुसऱ्या एका व्यक्तीच्या गळ्यातील एक चैन व हातातील अंगठी काढून घेतली. साहेब खर्डीत आहेत म्हणून ते निघून गेले. याबाबत आपली फसवणूक झाली असल्याचे ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. याबाबतची फिर्याद पोलीस स्थानाकात दाखल झाली नाही.