महाराष्ट्र
युवा नेते यशराजे साळुंखे पाटील यांचे कडून वाघमारे कुटुंबाचे सांत्वन
नाझरे (प्रतिनिधी ):- नाझरे ता. सांगोला येथील ह.भ.प. दादासो वाघमारे यांचे नुकतेच निधन झाले. वाघमारे यांनी चारो धाम यात्रा तसेच पंढरीची वारी कधीही चुकवली नाही तसेच देहू, आळंदी येथे त्यांचे पंढरीचा वारकरी म्हणून गणना झाली आहे. नाझरे येथे संत बाळूमामा यांचे मंदिर त्यांनी स्वखर्चाने उभे केले व सर्वजण त्यांना दादा म्हणत असत अशा या वारकऱ्याचे निधन झाल्याने यश राजे साळुंखे पाटील यांनी नाझरे येथे त्यांच्या घरी येऊन कुटुंबांचे सांत्वन केले व आधार दिला.
यावेळी पत्नी सखुबाई वाघमारे व मुले राजाराम दादासो वाघमारे, सुखदेव दादासो वाघमारे, संजय दादासो वाघमारे, दत्तात्रेय दादासो वाघमारे, युवा नेते पांडू वाघमारे, दादा हरिहर, नागेश रायचुरे, सुशांत ऐवळे, सागर वाघमारे, प्रवीण वाघमारे, सुरज रणदिवे व वाघमारे कुटुंबीय उपस्थित होते.