कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर नामस्मरण करा. युवा कीर्तनकार ह भ प सुप्रियाताई बंडगर

जवळे ( प्रशांत चव्हाण) कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याचे नामस्मरण करा चिंतन करा तरच तुम्ही आयुष्यात सुखी राहाल ज्यांच्या जीवनात नाम ही नाही साध्य ही नाही त्याच्या जीवनाला काही अर्थ उरत नाही.फक्त तुम्ही राम कृष्ण हरी जप करा तुमची सर्व पापे निघून गेल्याशिवाय राहणार नाहीत. असे मौलिक विचार जवळे गावच्या युवा कीर्तनकार ह भ प सुप्रियाताई बंडगर यांनी जवळे येथे सुरू झालेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व नवरात्र महोत्सवात व्यक्त केले.
पुढे बोलताना ह भ प सुप्रियाताई बंडगर म्हणाल्या जीवाला काय आवडतय ते बघण्यापेक्षा देवाला काय आवडतय ते बघितलं पाहिजे या जगात कोणीही सुखी नसून फक्त पंढरपूरचा देव पांडुरंग सुखी आहे.जीवनात कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी स्वतःठाम असावं लागतं त्यासाठी कष्ट करा भगवंताचे नाम स्मरण करा फक्त राम कृष्ण हरी असा जप करा तुमच्या जीवनातील दुःखाचे सुख झाल्याशिवाय राहणार नाही. असे सांगत उपस्थित भाविक भक्तांना श्रवणीय कीर्तनाचा आनंद दिला.
या कीर्तनामध्ये गायक, मृदंगमणी, टाळकरी, विण्याचे सेवेकरी चोपदार यांची मोलाची साथ लाभली. तत्पूर्वी पहाटे काकडा सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दुपारी भजन सायंकाळी प्रवचन,हरिपाठ हे कार्यक्रम संपन्न झाले. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.चंद्रकांत देशमुख गुरुजी,श्री.दीपक चव्हाण श्री. चंद्रकांत सुतार,श्री.रमेशआप्पा साळुंखे,श्री.पिंटू मधुरे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी जवळे पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते.