महाराष्ट्र

आदर्श नाभिक सेवा मंडळ शहराध्यक्षपदी तानाजी खंडागळे उपाध्यक्षपदी शंकर खंडागळे तर खजिनदार पदी हणमंत काळे यांची निवड 

आदर्श नाभिक सेवा मंडळाच्या शहराध्यक्षपदी युवा नेते तानाजी खंडागळे यांची तर उपाध्यक्षपदी शंकर खंडागळे तसेच खजिनदार पदी हणमंत काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यासह सदस्य यांच्याही निवडी संपन्न झाल्या.
आदर्श नाभिक सेवा मंडळ सांगोला यांच्यावतीने मिरज रोड येथील संतसेना महाराज मंदिरामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. सदरची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये वार्षिक सुट्ट्यांची नियोजन, वीर शिवबा काशीद यांची जयंती साजरी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये नवीन पदाधिकारी यांच्याही निवडी करण्यात आल्या.
यामध्ये शहराध्यक्षपदी तानाजी खंडागळे, उपाध्यक्षपदी शंकर खंडागळे, खजिनदार पदी हणमंत काळे तर सदस्य पदी अनिल काळे, अजय चव्हाण, दादा मोरे, पांडुरंग काशीद यांची निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष संतोष जगताप यांच्या हस्ते नूतन शहर अध्यक्ष तानाजी खंडागळे यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीसाठी सांगोला शहरातील सर्व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button