आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली यलमार मंगेवाडी येथील शेकाप व उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश

तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या व उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. हा शिवसेना पक्षप्रवेश रविवार दिनांक 3 नोव्हेंबर 2024 रोजी सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क कार्यालय सांगोला येथे करण्यात आला.
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदार शहाजीबापू पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कार्यकर्त्यांनी आपले योगदान देऊन जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करावेत. कार्यकर्त्यांच्या अडी-अडचणी प्रसंगी आपण सर्वतोपरी सहकार्य करू असा ठाम विश्वास आमदार शहाजीबापू पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
शेतकरी कामगार पक्ष व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये पांडुरंग विभुते ,लक्ष्मण जावीर ,अक्षय निकम, महादेव चव्हाण, चंद्रकांत काटे, संतोष नामदेव येलपले, विकास कांबळे, नवनाथ कांबळे, सिद्धू जाधव, विकास चौगुले, नितीन चौगुले, तानाजी जावीर, बिरा जावीर, रोहित जावीर, विजय जावीर, सुभाष घाटुळे ,उत्तम ऐवळे, बाळासाहेब वलेकर ,अक्षय जावीर ,अमोल जावीर, दत्तात्रय ऐवळे, विजय येलपले, श्रीकांत विलास येलपले, सचिन काटे, हर्षवर्धन काटे ,धनंजय गोरख काटे ,सुभाष नारायण काटे, वैजनाथ काटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांनी विशाल चव्हाण व परमेश्वर केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष प्रवेश केला .
यावेळी गावातील ज्येष्ठ मान्यवर व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले .यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना विजयी करून कॅबिनेट मंत्री करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कार्य करू असे आश्वासन दिले.