महाराष्ट्र

भंडीशेगावमध्ये शेकापला धक्का, कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

 

शेतकरी कामगार पक्षातील मनमानी कारभाराला कंटाळून शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातील शेकडो कार्यकर्ते दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. सांगोला विधानसभा मतदारसंघातील भंडीशेगावमध्ये शेकापला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत मशाल हाती घेतली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे सध्याचे नेतृत्व विश्वासात घेत नसल्याने तसेच अंतर्गत गटबाजीला कंटाळून कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. सांगोला विधानसभा मतदारसंघातील भंडीशेगावमध्ये शेकापला धक्का बसला असून असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत मशाल हाती घेतली आहे. भंडीशेगाव येथील जुलूस शेख, शाहिद शेख, इनुस शेख, शकील काझी, अरुण घाडगे, एजाज मुलाणी, असलम शेख, शाहरुख शेख, गफूर शेख, अमीर शेख, राहुल चव्हाण, अण्णा मुसळे, भास्कर दादा ननवरे, यासीन शेख या कार्यकर्त्यांनी शेकापला रामराम करीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना भाळवणी गटातून विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार पक्ष प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

फोटो ;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button