महाराष्ट्र

विकासाच्या मुद्द्यावर सांगोल्यात यंदा परिवर्तनाची मशाल पेटणार ; दिपकआबा साळुंखे पाटील

 

सांगोला : तालुका प्रतिनिधी

गेली ३० ते ३४ वर्षे मी सांगोला विधानसभा मतदारसंघात २४ तास काम करत आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील वाडीवस्तीवर माझा जनसंपर्क आहे. लोकांच्या अडचणी, व्यथा आणि वेदना यांची मला परिपूर्ण जाणीव आहे. आणि सांगोला विधान सभा मतदार संघाचे आगामी ५० वर्षांचे विकासाचे व्हिजन माझ्या डोळ्यासमोर आहे यंदा विकासाच्या मुद्द्यावर सांगोला विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची मशाल पेटणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.

मंगळवार दि ५ नोव्हेंबर रोजी सांगोला शहरातील ग्रामदैवत अंबिका देवीचे दर्शन घेऊन महाविकास आघाडीने प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी जयमालाताई गायकवाड, साईनाथभाऊ अभंगराव, माजी आमदार डॉ.राम साळे, संभाजीराजे शिंदे, प्रा.पी.सी.झपके, डॉ.धनंजय पवार, कमरूद्दिन खतीब, अरविंद पाटील, तुषार इंगळे, नंदकुमार दिघे, संतोष पाटील, विजयदादा येलपले, तानाजीकाका पाटील, शाहूराजे मेटकरी, अनिल खडतरे, अजयसिंह इंगवले, अभिषेक कांबळे, तोहिद मुल्ला, बिरा पुकळे, फिरोज मणेरी, शिवाजीराव जावीर, सखूताई वाघमारे, मैनाताई बनसोडे, सूर्यकांत घाडगे, सोमनाथ लोखंडे, जुबेर मुजावर, अनिलनाना खटकाळे, सुरेखा सरगर, विजय राऊत, आलमगीर मुल्ला, शिवाजीराव बनकर, मधुकर बनसोडे, शहाजी खरात, सतीश सावंत, राजकुमार पवार, मोहसीन तांबोळी, दिलीप मोटे, बाबुराव खंदारे, चंद्रकांत करांडे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, कालपर्यंत अनेक मंडळी देव पाण्यात घालून बसली होती. जनतेच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उभा राहिलो आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उध्दवसाहेब ठाकरेंनी माझी उमेदवारी जाहीर करून विजयाची मशाल हातात दिली. उध्दवसाहेब ठाकरेंनी सांगितल्यामुळेच गेल्या निवडणुकीत मित्राला आमदार केले. उध्दवसाहेब ठाकरे यांनी माझी आठवण ठेवली पण मित्राने आठवण ठेवली नाही. आबा मदत करायला लागला की बरा वाटतो अन् मी बाजूला झालो की वाईट ठरतो. शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी वाढतच चालली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आणि त्यांचा आपल्यावर असलेला विश्वास हेच आपले राजकीय भांडवल मानून मी ३० ते ३५ वर्षापासून जनतेची सेवा करीत आहे. विकासाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. आमदार झाल्यावर पहिल्या आठवड्यातच रोजगार निर्मितीसाठी पाच एमआयडीसी आणून तालुक्यात उद्योग उभा करण्याचे स्वप्न आहे असेही यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
यावेळी माजी आमदार डॉ राम साळे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, तानाजीकाका पाटील, तालुकाप्रमुख अरविंद पाटील, शहरप्रमुख तुषार इंगळे, काँग्रसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, अजित देवकते, नितीन खाडे यांनी मनोगत व्यक्त करताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

—————————

डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा आणि महाविकास आघाडीचा काडीचाही सबंध नाही

शेतकरी कामगार पक्षाचे स्वयंघोषित उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि त्यांचे समर्थक डॉ. बाबासाहेब देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याचा चुकीचा प्रचार सध्या सांगोला विधानसभा मतदारसंघात करत आहेत परंतु डॉ. बाबासाहेब देशमुख आणि महाविकास आघाडीचा काडीचाही संबंध नाही महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने मतदारांची दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक असा प्रयत्न केला जात असल्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे तालुकाध्यक्ष डॉ. धनंजय पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष अरविंद पाटील यांनी स्पष्ट केले.

 

—————————

ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…!

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील त्यांच्या पाठीशी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते खंबीरपणे उभा आहेत. दिपकआबा हे सांगोला तालुक्याचे अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व आहे. रात्री अपरात्री त्यांना कधीही फोन केला तर ते सौजन्याने बोलतात कधीही सर्वसामान्य मतदारांना शिवीगाळ करत नाहीत अशा शेलक्या शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी शहाजीबापू पाटील यांचा समाचार घेतला. आणि येतो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है असा इशाराही त्यांनी शहाजीबापू पाटील आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांना दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button