दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी कडधान्य व फळबाग लागवडीवर भर द्यावा – कृषीतज्ञ महादेव गोमारे.
शेतकऱ्यांसाठी "कोरडवाहू शेती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न
अँटलास कॉप को इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने व अस्तित्व संस्थे तर्फे दुष्काळी भागातील गरीब व स्थलांतरित मजुरांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी विकास कार्यक्रम सुरू असून या कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी “कोरडवाहू शेती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती सदर कार्यशाळेत कृषिभूषण व सेंद्रिय शेती तज्ञ महादेव गोमारे (लातूर) हे उपस्थित होते.
या कार्यशाळेत श्री गोमारे बोलत होते.ते म्हणाले दुष्काळी भागात सध्या विविध प्रकल्पांतर्गत पाणी उपलब्ध होत आहे या पाण्याचा वापर शेतकऱ्यांनी काट कसरिने करुन अन्नधान्य,कडधान्य व कोरडवाहू फळवाग लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन काढावे.रासायनिक खतांचा अमर्याद वापर न करता सेंद्रिय शेती तंत्राचा वापर शेतकऱ्यांनी करावा.अस्तित्व संस्था छोट्या शेतकऱ्यांना मदत करून त्यांना उभे करण्याचा जो प्रयत्न करीत आहे तो कौतुकास्पद असुन लाभार्थी शेतकऱ्यांनी त्याचा चांगला उपयोग करून उत्पादन वाढवावे असे आवाहन त्यांनी केले.कार्यशाळेस सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील ६० शेतकरी उपस्थित होते.
लातूर येथील कृषीतज्ञ महादेव गोमारे यांनी कार्यशाळेत विविध विषयांवर मार्गदर्शन केले, यामध्ये शेती साठी ठिबक सिंचनाचे महत्त्व, रसायन मुक्त शेती, योग्य पाणी व्यवस्थापन, बियाण्यांची निवड,बीज प्रक्रिया कशी करावी, संजीवनी रसाचे शेतीसाठी फायदे तसेच संजीवनी रस बनविण्याचे तंत्र इ. त्यानी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात केलें.तसेच संजीवनी रस बनविण्याचे तंत्र देखील शेतकऱ्यांना शिकविण्यात आले. एकूण ६० शेतकरी बांधवांनी कार्यशाळेत सहभाग घेतला होता. अस्तित्व संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी गडहिरे यांनी प्रास्ताविकात त्यानी प्रकल्पाची पार्श्वभूमी तसेच प्रकल्पांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली सूत्रसंचालन सागर लवटे यांनी केले.कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी दिपाली भूसनर आ्णि प्रविण सूर्यगंध यांनी केले.