सांगोला महाविद्यालयामध्ये सोमवार दि.02 ऑक्टों. 2024 रोजी महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेस महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी महात्मा गांधीचा आफ्रिकेतील वंशवादाविरोधातील लढा महत्वाचा आहे. त्यामुळेच ते ‘महात्मा’ झाले. देशाच्या स्वातंत्र्य लढयात महात्मा गांधी व लालबहाददुर शास्त्री़ यांचेसह अनेकांचे योगदान महत्वाचे आहे. नव्या पिढीने गांधीवाद अभ्यासायला हवा. तसेच नव्या पिढीमध्ये संस्काराचे बीज पेरण्यासाठी अशा थोर मान्यवरांच्या जयंती आणि पुण्यतिथी महाविद्यालयामध्ये साज-या केल्या जातात. तसेच विदयार्थ्यांनी नम्र व्हायला शिकले पाहिजे. कोणतीही हिंसा समज्यासाठी घातक असते, हिंसा किंवा भांडणातून प्रश्न सुटत नाहीत. हा महात्मा गांधीचा विचार नव्या पिढीने लक्षात घेतला पाहिजे असे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे नियोजन डॉ. अमोल पवार यांन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे यांनी सहकार्य केले. तसेच श्री. अवधुत कुलकर्णी व प्रदीप आसबे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.