महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिरच्या गणेशोत्सवाचे दुसरे पुष्प सामूहिक नृत्य स्पर्धेने संपन्न

नम्रता रुपनर व ग्रुप प्रथम, तन्वी खडतरे व ग्रुप द्वितीय

सांगोला (वार्ताहर) विविध कलांचा अधिपती श्री गणेशोत्सवानिमित्त दुसरे पुष्प सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सामूहिक नृत्य स्पर्धेने उत्साहात संपन्न झाले.या स्पर्धेमध्ये कुमारी नम्रता रुपनर व ग्रुप या ग्रुप – प्रथम क्रमांक, कुमारी तन्वी खडतरे व ग्रुप – द्वितीय क्रमांक आणि कुमारी प्रिया कावळे व ग्रुप – तृतीय क्रमांक या  सामूहिक नृत्यामधील विद्यार्थ्यांनी यश मिळवले.
यावेळी  स्पर्धकांनी विविध नृत्याविष्कार सादर केले. श्री गणरायाची आराधना करणाऱ्या विविध प्रकारच्या गाण्यांवर नृत्य करत उपस्थित विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद मिळवली.यावेळी व्यासपीठावर प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, उत्तम सरगर,  काकासाहेब नरुटे, उत्सव विभागाचे नरेंद्र होनराव, सांस्कृतिक विभाग प्रमुख नागेश भोसले उपस्थित होते.
 परीक्षक म्हणून अर्चना कटरे, राधा विटे व अश्विनी साळुंखे यांनी काम पाहिले.स्पर्धेचे सूत्रसंचालन संध्या तेली यांनी तर आभार अशितोष नष्टे यांनी मानले.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button