इनरव्हील क्लब व अंकलगी परिवार यांनी केली आगळीवेगळी दिवाळी..

गुरुवार दिनांक 31 ऑक्टोबर 2024 रोजी इनरव्हील क्लब ऑफ सांगोला व अंकलगी परिवारातर्फे मातोश्री वृद्धाश्रमामध्ये फराळ व कपड्यांचे वाटप करण्यात आले.
दिवाळीमध्ये आपल्या परिवारामध्ये तर सर्वच दिवाळी साजरी करतात परंतु ज्यांना आपला परिवारात नाही अशा वृद्धांना आपुलकी दाखवून त्यांच्या जीवनात दीप प्रज्वलित करून काही काळापुरता तरी प्रकाश निर्माण करून आनंद देण्याचा प्रयत्न केला चिंचोली रोडवरील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये सात महिला व पाच पुरुष वृद्ध असून त्यांचे आपले कोणीच नाही या दृष्टिकोनातून इनरव्हील क्लबचे अध्यक्ष सौ स्वाती अंकलगी सौ तसेच अंकलगी परिवारातील बच्चे कंपनी यांनी तेथील आजी आजोबांबरोबर दिवाळी साजरी केली.
त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता जेवढ्या व्यक्ती होत्या तेवढ्या त्यांच्या वेगवेगळ्या कहाण्या होत्या. त्या सर्वांनी आपल्या बऱ्याच गोष्टी या सर्व सदस्यांच्या समवेत शेअर केल्या त्यांचा स्वतःचा परिवार कसा त्यांच्यापासून दूर झाला या गोष्टी त्यावेळी जाणवल्या. त्यांच्या चेहऱ्यावर जणू काय त्यांचा परिवारच भेटायला आला होता असा भाव होता आणि एक वेगळा आनंद होता..
या सर्व आजी आजोबांना कपडे व फराळाचे साहित्य देण्यात आलं व फटाके फोडून त्यांच्या समवेत दिवाळी ही साजरी करण्यात आली. दिवाळीच्या या सुंदर कार्यक्रमांमध्ये इनरव्हील क्लबला सौ अलका सोनलकर यांचे विशेष सहकार्य लाभले. इनरव्हील क्लब च्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले