सुयोग इलेक्ट्रॉनिक्सच्या वतीने भव्य लकी ड्रॉ उत्साहात संपन्न; श्री.अंकुश जांभळे अॅक्टीव्हा गाडीचे भाग्यवान विजेते

सांगोला (प्रतिनिधी):- सुयोग एजन्सीज सुयोग सेल्स अॅण्ड सर्व्हिसेस, सुयोग फर्निचर्स आणि सुयोग ईलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीमध्ये खरेदी करणार्या ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ कुपन योजना आयोजित केली होती. त्या योजनेची सोडत काल दि. 13 फेबु्रवारी 2023 रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हर्षदा लाँन्स या ठिकाणी करण्यात आली.
यावेळी सांगोला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.सुधीर गवळी, जिल्हा दूध संघ संचालक विजयदादा येलपले, सांगोला पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. हुल्ले, बजाज फायनांन्स रिजनल मॅनेंजर अश्वथ देशमुख, एच.डी.एफ.सी. फायनांन्स एरिया सेल्स मॅनेंजर धीरज सोनवणे, बजाज फायनांन्स फ्रँचेसी सांगोला ब्रँच प्रशांत मस्के हे सर्व मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचा सुयोग ईलेक्ट्रॉनिक्स परिवाराच्या वतीने यथोचित असा सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक सुयोग गाटे यांनी केले. प्रास्ताविकानंतर लकी ड्रॉ योजनेची सुरूवात करण्यात आली. यामध्ये जवळपास तीन महिन्यामध्ये 800 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला होता. सर्व समाधानी ग्राहक यावेळी उपस्थित होते. एकूण बक्षीसांची संख्या 15 अशी होती. त्यामध्ये एक अॅक्टीव्हा गाडी, एक कपाट, एक फ्रिज, एक एल.ई.डी. टीव्ही, एक सोफा सेट, दोन डिनर सेट, दोन कुकर, दोन होम थिएटर, दोन मिक्सर, दोन इंडक्शन शेगडी, अशा प्रकारची पारितोषिके ठेवण्यात आली होती.
हा लकी ड्रॉ सोहळा संपन्न करण्यासाठी सुयोग ईलेक्ट्रॉनिक परिवाराचे सुहास गाटे, शेखर गाटे, संजय गाटे, सुयोग गाटे, सागर गाटे तसेच सुयोग ईलेक्ट्रॉनिक्सचे सर्व सेल्समन, व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन इरशाद बागवान सांगोला यांनी केले.
भाग्यवान विजेत्यांची नावे
महा बंपर अॅक्टीव्हा गाडी- अंकुश जांभळे सांगोला ,
बंपर प्राईज कपाट – दीपक होवाळ शिरभावी ,
बंपर प्राईज फ्रिज- तात्यासो बेहरे चिंचोली ,
बंपर प्राईज एल.ई.डी.- विलास कवडे बलवडी ,
बंपर प्राईज सोफा सेट- अमिर मुलाणी आंधळगाव
आकर्षक बक्षीसे
डीनर सेट- अंबिका सुधाकर पाटणे, मेहजबी इनामदार
कुकर – भुषण भारत माळी, सोमनाथ गजानन चांडोले
होम थिएटर- सिध्देश्वर शिवलिंग घोंगडे , मोहसीन काझी
इंडक्शन शेगडी – विठ्ठल कवठेकर, आप्पा आण्णा अवघडे
मिक्सर – आकाश तेली, विश्वास काकेकर