सांगोला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे मुकबधिर निवासी शाळेत रक्षाबंधन

सांगोला प्रतिनिधी: सांगोला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राखी पौर्णिमेचे औचित्य साधून मुकबधिर निवासी शाळा सांगोला  येथे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी डॉ. नवनाथ शिंदे व डॉ. सदाशिव देवकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पारंपारिक पद्धतीने औक्षण करून राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक विद्यार्थिनींनी राखी बांधली याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ. सदाशिव देवकर यांनी आपल्या प्रास्ताविकेत रक्षाबंधनाचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकी याविषयी मत मांडले जे विद्यार्थी या दिवशी आपल्या घरी उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांना या सणाचा आनंद मिळावा म्हणून महाविद्यालयाकडून हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी घेण्यात आला. सदरील कार्यक्रम हा मुकबधिर विद्यार्थ्यांना मिठाई व अल्पोपहार देऊन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रा. डॉ. मालोजी जगताप, प्रा. संतोष लोंढे, प्रा. अमोल पवार व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. सदाशिव देवकर व मूकबधिर शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button