कोळा(वार्ताहर) कोळा विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष 2024 – 25 या वर्षातील इयत्ता दहावी टॉपर्स विद्यार्थ्यांची शिक्षक- पालक – विद्यार्थी यांची प्रशासनाबरोबर सहविचार सभा दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता संपन्न झाली.
या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी मा. मुख्याध्यापक श्रीकांत लांडगे सर होते. यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली आहे. सतत लेखन, वाचन केल्यामुळे निश्चित यश प्राप्त होते. स्वयं -अध्ययन करून सर्वांनी चांगली मार्क मिळवावीत व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करावा व आपला, पालकांचा, शाळेचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पालकांच्या शंकेचे निरसन केले.
याप्रसंगी पालकांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाबद्दल कौतुक केले व मुलांच्या अडचणी व सूचना मांडल्या आणि शाळेचे व संस्थेचे आभार मानले.यावेळी 34 विद्यार्थ्यांच्या पालकापैकी 25 पालक उपस्थित होते. यावेळी सर्व विषय शिक्षकांनी पालकांना आपली ओळख करून दिली व आपल्या विषयासंबंधी थोडक्यात मार्गदर्शन व सूचना केल्या. यावेळी प्राचार्य श्रीकांत लांडगे, पर्यवेक्षक चारुदत्त जगताप पालक प्रतिनिधी युवा उद्योजक सुरेश आलदर, शंकर आलदर, पांडुरंग कोळेकर, सदाशिव आलदर, उत्तम हनमाने, सुखदेव आलदर, नाथा आलदर, संजय माने, अशोक कोरे, धनाजी नरळे व महिला पालकांमध्ये सौ. वैशाली सरगर, तृप्ती काटे, सुजाता पाटील, सारिका कचरे, गीतांजली शेटे इत्यादी पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात किरण ढोले सर यांनी टॉपर्स उपक्रमाचे स्वरूप, उद्दिष्टे व पुढील नियोजनासंबंधी सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रभुलिंग तेली सर व सूत्रसंचालन मारुती सरगर सर यांनी केले यावेळी सर्व दहावी विषय शिक्षक, टॉपर्स विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.