जय भवानी गणेश मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

नंदेश्वर ता- मंगळवेढा येथील जय भवानी गणेश मंडळातर्फे सालाबादप्रमाणे याहीवर्षी विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. आज दिनांक ८ सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे यांच्या शुभहस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या रक्तदान शिबिरामध्ये एकुण ६५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. या रक्तदान शिबिरासाठी पंढरपूर ब्लड बँक रक्त संकलित करण्यासाठी उपस्थित होती. त्याचबरोबर मंडळातर्फे अन्नदान करणे, वृक्षारोपण, कीर्तन, प्रवचन,भारुड,आर्केस्ट्रासह आट्यापट्याच्या सामन्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जय भवानी गणेश मंडळाचे अध्यक्ष विराज रुपनर व उपाध्यक्ष राजू गरंडे यांनी दिली.



