सांगोला विद्यामंदिर मध्ये एन.एम.एम.एस.पालक सभा संपन्न

शिक्षक,विद्यार्थी व पालक यांच्या समन्वयातून यशाची हमी -प्राचार्य अमोल गायकवाड
सांगोला (वार्ताहर) सांगोला विद्यामंदिर प्रशालेस गुणवत्तेचा मोठा वारसा असून मा.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके सर यांची प्रेरणा मा.प्रशुद्धचंद्र झपके साहेब यांचे मार्गदर्शन, प्रशासनाचे नियोजन, शिक्षकांचे कष्ट, पालकांचे सहकार्य व विद्यार्थ्यांचा सराव या मार्गातून आजपर्यंत प्रशालेतील शेकडो विद्यार्थी प्रतिवर्षी शिष्यवृत्ती पात्र होत असून भविष्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध राहू असे उद्गार प्राचार्य अमोल गायकवाड यांनी एन.एम.एम.एस. मार्गदर्शन वर्गाच्या पालकसभेत बोलताना काढले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका शाहिदा सय्यद, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे, संस्था बाह्यपरीक्षा प्रमुख नामदेव खंडागळे. प्रशाला बाह्यपरीक्षा प्रमुख वैभव कोठावळे, NMMS प्रमुख निलेश जंगम उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा दररोजचा अभ्यास, शाळेतील उपस्थिती, प्रश्नांचा सराव, आहार व आरोग्य जपत योग्य नियोजनानेच आपणास परीक्षेपर्यंतची वाटचाल करावयाची असल्याचे त्यांनी पुढे बोलताना सांगितले.
प्रारंभी सभेचे प्रास्ताविक पर्यवेक्षक प्रदीप धुकटे यांनी केले. विभाग प्रमुख निलेश जंगम यांनी NMMS परीक्षेबद्दल माहिती आणि एकूण वर्षभरातील अध्यापनाचे नियोजन आपल्या मनोगतातून सांगितले. तदनंतर सर्व विषय शिक्षकांनी आपला परिचय दिला. रोहिणी शिंदे, सिताराम राऊत, शितल कांबळे, मनीषा पांडे, अमोल महिमकर या शिक्षकांनी आपल्या विषयाचा अभ्यास कसा करावा याबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी दत्तात्रय लाडे, वैशाली कटके, पुनम राजमाने, शुभांगी लिगाडे या पालकांनी प्रशालेचे ज्यादाचे मोफत मार्गदर्शन व नियोजनाबाबत ऋण व्यक्त करत सूचना मांडल्या.सभेचे सूत्रसंचालन अमोल महिमकर यांनी तर आभार राजेंद्र ढोले यांनी मानले.
यावेळी मंगेश म्हमाणे, विनीत चिकमने, शिवानंद लोखंडे, कविता राठोड, प्रिया कोरे, दिग्विजय चव्हाण, भारती गयाळी, अजित मोरे या शिक्षकांसह बहुसंख्य पालक उपस्थित होते.सभा यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.