महाराष्ट्र
रमेशआण्णा देशपांडे यांचे कडून कर्नाटक दिंडीस प्रसाद वाटप…

कर्नाटक राज्यातील झुंजूरवाड ता.अथणी जि.बेळगाव येथून कार्तिकी एकादशीनिमीत्त दर वर्षी एक दिंडी सांगोलयातून मार्गस्थ होत आहे..सांगोला शहरातील भाविक व सामाजिक कार्यकर्ते रमेशआण्णा देशपांडे हे दरवर्षी या दिंडीचे स्वागत करतात..त्यांच्या मार्फत भजन सेवा सादर करुन प्रासाद वाटप म्हणून संपूर्ण दिंडीस देशपांडे परिवारातर्फे भोजन दिले जाते..
या अगोदर देशपांडे यांच्या खारवटवाडी येथील शेतामध्ये काही दिवस मुक्ताई रिसॉर्ट येथे व नंतर सांगोला येथील एस.टी.स्टँड समोरील , जिजामाता उद्यानाजवळ आपुलकी या निवास स्थानी सदर दिंडी सोहळा,भजन सेवा व महाप्रसादाचे वाटप केले जाते…
सालाबाद प्रमाणे याही वर्षी शुक्रवारी सदर दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला..रमेशआण्णा देशपांडे परिवार,मित्रमन्डळ,आपूलकी प्रतिष्ठान सदस्य व सांगोला रोटरी क्लब च्या पदाधिकारी व सदस्यांनी सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले…



