महाराष्ट्र

जुजारपूरचे माजी सरपंच व सोसायटीच्या माजी चेअरमनसह कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

 

शेकापच्या नेतृत्वावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास नसल्याने जुजारपूरचे शेकापचे माजी सरपंच व सोसायटीच्या माजी चेअरमनसह कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. दिपकआबांच्या कल्पक आणि कार्यकुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला असून विधानसभा निवडणुकीत जुजारपूर गावातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

 

शेकापच्या नेतृत्वावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विश्वास नसल्याने शेकापमधील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा लाल सलाम करीत दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रवेश करीत आहेत. सांगोला तालुक्यातील जुजारपूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीपान हिप्परकर, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन भानुदास हिप्परकर, बापू खिलारे, दादासो अमृत हिप्परकर, रवी खाडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या कल्पक नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून मशाल हाती घेतली. यावेळी विजय बजबळे, शहाजी हातेकर, नारायण बजबळे, मेजर शिवाजीआण्णा करांडे, हनुमंत हिप्परकर, मनोज घाडगे, दादा माने, श्रावण हिप्परकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button