डोंगरगाव येथील पांडुरंग बाबर यांचे निधन

डोंगरगाव येथील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आणि डोंगरगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन श्री. पांडुरंग परशुराम बाबर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. ते सांगोला नगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी श्री. चंद्रकांत बाबर यांचे वडील होते. त्याचे पश्चात दोन मुले, एक मुलगी सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधि दिनांक १९-१-२०२३ रोजी गुरुवारी सकाळी ८.०० वाजता डोंगरगाव येथिल स्मशानभूमीत होणार असल्याचे सांगीतले आहे.