सांगोला तालुका

वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी कोळसा वाहतूक करणारा आयसर पोती 360 मालासह जप्त

वनपरिक्षेत्र सांगोलामध्ये दिवसा फिरती करत असताना सांगोला नियतक्षेत्रात मौ. वाढेगाव ते पुणे रस्त्यावर सदर वाहनाची तपासणी केली. यामध्ये अवैध वाहतूक कोळसा पोती 360 मिळून आली.
सदर आयसर काळ्या ताडपत्रीने बांधून वाहतूक करित होता. वाहन चालक श्री. आप्पासो काकडे रा. जवळा यांना वनपाल सांगोला यांनी कोळसा वाहतूक पास परवाना विचारला असता कोळसा वाहतूक करणेसाठी माझ्याकडे वनविभागाचा वाहतूक पास नाही असे सांगितले. सदर कोळसा पोती 360 मौ. वाढेगाव येथून पुणे येथे अवैध वाहतूक होत असल्यामुळे आयसरमधील कोळसा पोती 360 सह वाहन जप्त केले. वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला कार्यालयाशेजारी वाहन ठेवले आहे.
जप्ती पंचनामा करून वाहन ताब्यात घेतले. वाहन चालक श्री. आप्पासो काकडे यांनी सांगितले कि, सदर कोळसा पोती 360 हि सचिन बंडगर रा.अनकढाळ कोळसा व्यापारी यांची आहेत. मी वाहतूक भाडे करित होतो. अवैध कोळसा पोती 360 त्याचे वजन 9000 कि. ग्रॉ. आहे. तसेच 360 कोळसा पोती बाजारभावप्रमाणे अंदाजे किंमत दोन लाख रु. होईल. सदरचा कोळसा हा मालकी क्षेत्रातील आहे. मौ. वाढेगाव येथे वनविभागाचे वनक्षेत्र नाही.
पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर करत आहेत. वृक्षतोडीसाठी वृक्षतोड परवाना घेणे, वाहतूक करणेसाठी वनविभागाचा वाहतूक पास घेणे व कोळसा वाहतूक करणेसाठी वनविभागाचा वाहतूक पास घेणे आवश्यक आहे. वृक्षतोड परवाना नसेल व वाहतूक पास नसेल तर कारवाई केली जाईल असे आव्हान लोकांना वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर यांनी केले आहे.
सदर अवैध कोळसा वाहतूक कारवाई मा. मुख्य वनसंरक्षक पुणे श्री.एन.आर. प्रविण साहेब, मा. उपनवसंरक्षक सोलापूर श्री. धैर्यशील पाटील, मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री.बी.जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर, वनपाल सांगोला श्री. एस. एल. मुंढे, वनरक्षक कटफळ श्री.आर.व्ही. कवठाळे व हंगामी वाहन चालक श्री. संकेत बाबर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!