सांगोला तालुकामहाराष्ट्रशैक्षणिक

खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात ; सांगोल्यात आज जाहीर सभा 

सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्या तोफाही सांगोल्यात धडाडणार 

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत खास अशी ओळख असलेल्या खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आता खुद्द उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहेत. सांगोला शहरातील नेहरू चौक येथे रविवार दि २८ रोजी दु २.०० वा ही प्रचारसभा होणार आहे. विशेष म्हणजे या सभेत शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या तोफाही सांगोल्यात या प्रचार सभेतून धडाडणार आहेत. या सभेला सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासह महायुती मधील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला माढा लोकसभा मतदारसंघ खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी २०१९ रोजी भाजपकडे खेचून आणला होता. याच लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केल्याने या मतदार संघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघात २०१९ पासून हजारो कोटींची विकास कामे करून पुन्हा एकदा केलेल्या विकास कामाच्या नावावर खा निंबाळकर मैदानात उतरले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला, माण, खटाव आणि माळशिरस या दुष्काळी तालुक्याचा पाणीप्रश्न खा निंबाळकर यांच्या माध्यमातून अंतिम टप्प्यात आहे. तसेच ५० वर्षे प्रलंबित असलेला फलटण ते लोणंद पुणे रेल्वे मार्गाच्या प्रश्न मार्गी लावून खा निंबाळकर यांनी आपली दावेदारी अधिक भक्कम केली आहे. पाणी रेल्वे वीज आरोग्य आणि रस्ते याविषयी केलेल्या कामाच्या जोरावरच खा निंबाळकर पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. खा निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार तसेच शेतकरी नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि फर्डे वक्ते आमदार गोपीचंद पडळकर या सभेतून कुणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
शहाजीबापूंच्या भाषणाची सर्वांना उत्सुकता 
माढा लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या सुरुवातीलाच सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील विरुद्ध मोहिते पाटील आणि उत्तम जानकर असा सामना रंगला आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना बापूंनी मोहिते पाटील यांचा रावण तर उत्तम जानकर यांचा हुंडा वाला म्हणून उल्लेख केला आहे त्यामुळे आजच्या सभेत बापू नेमके काय बोलणार यावर ही सर्वांचे लक्ष असेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!