महाराष्ट्र

महादेव कांबळे यांनी दिला आमदार शहाजी बापू पाटील यांना जाहीर पाठिंबा..

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रवक्ते एडवोकेट महादेव कांबळे यांनी आज विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला.

 

महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना या घटक पक्षा सोबत असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचे काम करण्याचे आदेश आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब यांच्याशी आपण दूरध्वनीवरून चर्चा करून हा पाठिंबा देत असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणूक रणधुमाळी सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते एडवोकेट महादेव कांबळे यांनी शहाजी बापू पाटील यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम करणार आहे.

 

शहाजी बापू यांनी केलेल्या विकास कामामुळे आपण त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत असे मत व्यक्त केले.शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर पाठिंबा दिल्याबद्दल ऍडव्होकेट कांबळे यांचे जाहीर स्वागत केले व सोबत राहून काम करूया. सांगोला तालुक्यातील विकासाचे स्वप्न पूर्ण करूया असे मत यावेळी व्यक्त केले. कांबळे हे फरडे वक्ते असून सांगोला तालुक्यामध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे याचा निश्चितपणे या निवडणुकीमध्ये बापूंना फायदा होईल अशी चर्चा लोकांमधून ऐकावयास मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button