महाराष्ट्र
253 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ खा.श्रीकांत शिंदे यांची महूद येथे मंगळवारी जाहीर सभा

सांगोला /प्रतिनिधी=253 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू राजाराम पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार श्रीकांतजी शिंदे यांची मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता महुद येथील बाजार पटांगणामध्ये जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेसाठी सांगोला तालुक्यातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार यांनी मोठ्या संख्येने सभेस उपस्थित राहावे.
सायंकाळी 4 वाजता सांगोल्यातील महुद रोड येथील कविराज मंगल कार्यालय येथे रामोशी समाजाचे राज्याचे नेते दौलतनाना शितोळे यांची सभा आयोजित केली आहे.