महाराष्ट्र
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर…

सांगोला शहरातील माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर झाली असुन सन 2029 पर्यंत ही कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे..संस्थेच्या नूतन अध्यक्षपदी प्रा.निलिमा कुलकर्णी व सचिवपदी वसुंधरा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
त्याच प्रमाणे उपाध्यक्षपदी डॉ.संजीवनी केळकर,सहसचिवपदी डॉ.केतकी देशपांडे,कोषाध्यक्षपदी डॉ.शालिनी कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे…महिलानी सुरु केलेल्या व महिला कार्यान्वित करत असलेल्या या संस्थेची दखल देशपातळीवर घेतली गेली असुन नविन पदाधिकारी वर्गाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे…