अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाला जाहीर पाठिंबा

गेल्या तीन वर्षात डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सर्वसामान्य जतनेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या विकासपर्वाला सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी माझं जनता..माझी जबाबदारी हे ब्रीद त्यांनी कसोसीने पाळले. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक, शेतकरी बांधव, गोरगरीब नागरिक,युवा कार्यकर्ते हे डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यातच आता अखिल भारतीय होलार समाज संघटनेने पाठिंबा दिल्यामुळे डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विजयामध्ये विक्रमी वाढ होणार असल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांमधून सांगण्यात येत आहे.
पाठिंबा पत्रावर अध्यक्ष चरण भडंगे, सहसचिव केशव हेगडे, कार्याध्यक्ष पुंडलिक भंडगे, सचिव रावसाहेब भजनावळे सर, शिवाजी गेजगे सर, शिवाजी हातेकर, अण्णा गेजगे, दाजी केंगार, दीपक ऐवळे, मारुती हातेकर, बिरू भंडगे, महादेव पारसे, सुशील कुमार सावे, मानाप्पा भडंगे, प्रवीण सावे, दादासाहेब पाटील यांच्या स्वाक्षरी आहेतं.
———————————-
अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचे आभार मानत संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जो विश्वास माझ्यावर व शेतकरी कामगार पक्षावर दाखविला त्या विश्वासास तडा जाऊ दिला जाणार नाही. येणार्या कालावधीत सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करु.
डॉ.बाबासाहेब देशमुख