सांगोला लायन्स क्लब अन्नदान सप्ताहाची वस्त्रदानाने सांगता

मातोश्री वृद्धाश्रम सांगोला अन्नदान सप्ताह व वस्त्रदान
सांगोला (प्रतिनिधी) माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे मार्गदर्शनाखाली सांगोला लायन्स क्लबकडून आरोग्य, पर्यावरण, अन्नदान, मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर असे सामाजिक उपक्रम नेहमी राबविले जातात. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही लायन्स क्लब संघटनेच्या प्रमुख पाच उपक्रमापैकी भुकेलेल्याला अन्न देऊन त्यांची भूक दूर करणे या उपक्रमांतर्गत सांगोला लायन्स क्लबने अन्नदान सप्ताहाचे आयोजन केले होते.त्यामध्ये लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य यांचेकडून १५ ते २१ ऑक्टोबर २०२४ रोजी सामातोश्री वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले.या अन्नदान सप्ताहाची सांगता वस्त्रदानाने झाली.
यावेळी माजी प्रांतपाल ला.प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला लायन्स क्लब अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर, सचिव ला.अजिंक्य झपके, खजिनदार ला.नरेंद्र होनराव, कॅबिनेट ऑफिसर सीए ला.उत्तम बनकर,ला.प्रा.धनाजी चव्हाण, संचालक ला.प्रा.अमर गुळमिरे, प्राचार्य,सदस्य ला.अमोल गायकवाड, सदस्य ला.विवेक घोंगडे,ला.प्रा.शिवशंकर तटाळे,ला.प्रा.तानसिंग माळी यांचे हस्ते वस्त्रदान करण्यात आले. यावेळी मातोश्री वृद्धाश्रमचे राहुल जाधव उपस्थित होते.
तसेच या अन्नदान सप्ताहामध्ये ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,सीए.ला.उत्तम बनकर,ला.प्रा.धनाजी चव्हाण,ला.अमर लोखंडे,,ला.विलास क्षीरसागर, ला.प्रा.अमर गुळमिरे, ला.अमोल गायकवाड,ला.अच्युत फुले,, ला.मिंलिंद फाळके,ला.मंगेश म्हमाणे,ला.अमोल महिमकर,ला.प्रदिप चोथे,, ला.विवेक घोंगडे,ला.प्रा.शिवशंकर तटाळे,ला.सचिन पाटणे,ला.गणेश पैलवान,, ला.उन्मेश आटपाडीकर, ला.अजिंक्य झपके,ला.नरेंद्र होनराव,ला.हरिदास कांबळे,, ला.काकासो नरूटे,ला.बाळराजे सावंत,ला.दतात्रय देशमुख, ला.सुमन कांबळे,,ला.शुभांगी घोंगडे ,ला.शैलजा झपके,श्री.प्रकाश म्हमाणे,श्री.चिंतामणी देशपांडे यांनी अन्नदान व वस्त्रदान केले .