शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने (वर्ष 16 वे) मंगळवारी भव्य रक्तदान शिबीर

सांगोला( प्रतिनिधी ) शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल व 26/11/2008 रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ तसेच सोलापूरचे तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त स्व.अशोकजी कामटे यांच्या 16 व्या स्मृतिदिनानिमित्त सांगोल्यात आज मंगळवारी दि.26/11/2024 रोजी स्टेशन रोड विटा बँकेसमोर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे .
तसेच कारगिल युद्धातील जवान ,माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिक, वीर माता-पिता यांचा सन्मान, सर्व रक्तदात्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करणार आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक निलकंठ शिंदे सर यांनी दिली.
भव्य किल्ले बांधणी स्पर्धा 2024 बक्षीस वितरण सायं 5.00 वा व शहिदांना श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित केले आहे. या कार्यक्रमाप्रसंगी शहीद अशोक कामटे संघटनेच्यावतीने पोलीस दल, सैनिक, अधिकारी,अनेक समाजसेवक , विद्यार्थी या मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमास सर्व शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहुन शहिदांना आदरांजली अर्पण करावी असे आव्हान शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.
—————————————-