महाराष्ट्र

आबा बापूंना मोठा धक्का; यलमर मंगेवाडी गावातील कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये जाहीर प्रवेश

सांगोला: शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तालुक्यातील विद्यमान दोन्ही नेतृत्वाला कंटाळून डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत शेकाप मध्ये प्रवेश केला.विधानसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांना कोणत्याही परिस्थितीत आमदार करायचे या ईर्षेने पेटलेल्या यलमर मंगेवाडी गावातील कार्यकर्त्यांनी आबा बापूना रामराम करीत एकदिलाने शेकाप मध्ये प्रवेश केला

डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत यलमर मंगेवाडी येथील शिवसेना शिंदे गटाच्या  व शिवसेना उबाठा गटाच्या अनेक कार्यर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.यावेळी अनिल पाटील (शिवसेना शिंदे गट), सत्यवान घाटुळे (शिवसेना उबाठा), प्रशांत येलपले ( तालुका व्यापारी संघटना सदस्य) व लता विभुते (शिवसेना शिंदेगट महिला आघाडी प्रमुख ) यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.

 

सांगोला तालुक्यातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून आबा बापूंच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाला अखेरचा निरोप देत डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शेकाप मध्ये प्रवेश केला.

आगामी निवडणुकीला ध्यानात ठेवून प्रस्थापित नेत्यांकडून समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे सर्वसामान्य जनतेला दिसतंय. शेतकरी कामगार पक्षाकडून आजपर्यंत असे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. शेकाप विरोधी नेतृत्व जेव्हाही सांगोला तालुक्यात बनते, तेव्हा या नेतृत्वाकडून समाजात फूट पाडणे किंवा भांडणे लावणे हा प्रकार झाला आहे. सत्तेशिवाय ही लोक राहू शकत नाही. संगोल्याची प्रतिमा मलिन करणे. जनतेत भ्रम निर्माण करणे हे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्याच प्रमाणे सर्वसामान्य जनतेवर अन्याय वाढल्या मुळे तसेच सर्वसामान्य जनतेमधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बद्दल मोठी सहानुभूती दिसून येत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत देखील शेतकरी कामगार पक्षाचा दणदणीत विजय होणार असल्यामुळे आम्ही शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button