मेजर संजय बाबर यांच्याकडून चोपडी येथील संगमनगर शाळेस स्टेज बांधकामासाठी 85 हजार रुपयांची देणगी

सांगोला/ प्रतिनिधी: जि. प. प्राथमिक शाळा संगमनगर येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना स्टेज डेरिंग मिळावे, अशी मनोमन भावना असणारे व या शाळेचे माजी विद्यार्थी , सध्या देशसेवेसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे दानशूर व्यक्तिमत्व मेजर संजय आप्पासो बाबर यांनी शाळेच्या मुलांसाठी 85 हजार रुपये किमतीचा मजबूत स्टेज बांधून देऊन देशसेवेबरोबर शाळेच्या मुलांच्या सेवेला हातभार त्यांनी लावला.
जि .प. प्राथमिक शाळा संगमनगर या शाळेचा पट 32 असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती पाहता मेजर संजय बाबर यांनी समाधान व्यक्त केले. मला माझ्या परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काहीतरी मदत करावी त्यांची मनोमन भावना होती. त्यासाठी ते शाळेतील शिक्षकांच्या संपर्कात सतत राहायचे, शाळेतील अडीअडचणी नेहमी समजून घ्यायचे. शाळेतील भौतिक सुविधा कमतरतेकडे त्यांचे लक्ष असायचे. ते नेहमी बोलायचे मी शाळेत भेट देणार तसाच प्रसंग 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिना दिवशी त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ,त्यांनी शाळेत स्टेज बांधून देतो असे जाहीर केले व सहा महिन्याच्या आत सुंदर देखना मजबूत असा स्टेज त्यांनी स्वखर्चाने बांधून दिला. मेजर संजय बाबर गेली सतरा वर्ष देश सेवेसाठी नोकरी करतात, नोकरी करत असताना त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत .
आदर्श मेजर म्हणून त्यांच्या बटालियनने त्यांचा गौरव केला आहे. .जीवन जगत असताना आपल्या कुटुंबाबरोबर आपण समाजाचे देणे असतो. समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे .आपण ज्या समाजात परिसरात राहतो तो परिसर व समाज सुधारण्याचा प्रयत्न आपण नेहमी केला पाहिजे असे त्यांचे मत आहे. हीच भावना मनात ठेवून शाळेच्या मुलांसाठी उत्तरदायित्व त्यांनी प्रदान केले आहे. त्यांनी दिलेल्या स्टेजचे उद्घाटन शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दिवशी करण्याचे ठरले त्यांनी उद्घाटन समारंभासाठी उपस्थित रहावे ही विनंती शाळेकडून केली असता त्यांनी सांगितले की जिच्यामुळे मी हे जग पाहिले ज्या आईने मला मोठे केले व देश सेवेसाठी मला पाठविले त्या आईच्या हस्ते उद्घाटन घ्यावे. त्यांना त्यांच्या आई विषयी खूप प्रेम आहे व कुटुंबाविषयी पण प्रेम आहे. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमादिवशी मेजर संजय आप्पासो बाबर यांच्या मातोश्री कमल आप्पासो बाबर यांच्या हस्ते स्टेजचे शानदार असे उद्घाटन करण्यात आले व शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. नवनाथ बाबर व विठ्ठल बाबुराव जरग( अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर सुंदर देखना असा पालक वर्गांच्या सहकार्याने सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला. पालक वर्गात सांस्कृतिक कार्यक्रमामुळे व मुलांच्या प्रगतीमुळे वातावरण आनंदी झाले
याप्रसंगी ॲड. सचिन बाबर ,रामचंद्र बाबर दत्तू बाबर, अंकुश बाबर,( उपाध्यक्ष) अंकुश बाबर, संजय पाटील ,अमित गोडसे, मेजर रावसाहेब गोडसे, राहुल बाबर ,दिलीप बाबर ,लक्ष्मण भोसले (गुरुजी), बाळासो बाबर ,अजित भोसले, श्रीकांत घाडगे, गणेश भोसले, नवनाथ बाबर, पोपट बाबर ,कृष्णदेव बाबर, गणेश बाबर, दिपक बाबर, सदाशिव बाबर, दादासो बाबर, विलास भोसले ,लक्ष्मण पाटील, संजय बाबर, ज्योतीराम जरग, तानाजी जरग, आबासाहेब जरग व अमर गणेश मंडळातील सर्व सदस्य व महिला वर्ग उपस्थित होते. मेजर संजय बाबर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय धबधबे गुरुजी व आभार प्रदर्शन राजश्री कुल्लोळी मॅडम यांनी केले.