डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी मतदारसंघातील सर्वसामान्य जनता ‘जात-धर्म-पंथ’ विसरून मोठ्या ताकदीने एकवटू लागली..

सांगोला: सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांना सांगोला शहरातील मुजावर गल्लीतील मुस्लिम बांधवांकडून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. मुस्लिम बांधवांकडून पाठिंबा मिळाल्यामुळे तालुक्यात डॉ. बाबासाहेब देशमुख यांची ताकद वाढली असल्याचे दिसून येत आहे.
सांगोल्याच्या स्वाभिमानासाठी आणि आभिमानासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी घेतलेल्या निर्णायक लढ्यास शहरातील मुस्लिम बांधवांनी बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी मतदारसंघातील सर्वसामान्य जनता ‘जात-धर्म-पंथ’ विसरून मोठ्या ताकदीने एकवटू लागल्याचे यानिमित्ताने अधोरेखित होऊ लागले आहे.
शहरात व तालुक्यात साठ वर्षापासून सुरू असलेली शांतता व सुव्यवस्था टिकवण्यासाठी त्याचप्रमाणे जातीयतेढ थांबविण्यासाठी डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांना मतदान करून त्यांना विजयी करावे असे आवाहन सांगोला शहरातील मुस्लिम बांधवांकडून करण्यात आले आहे.
सांगोला मतदारसंघातील अनेक गावांमधील सर्वसामान्य जनता व प्रभावशाली कार्यकर्ते स्वयंस्फूर्तपणे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. गेल्या पाच वर्षातील सर्वसामान्य नागरिकांना झालेल्या त्रासामुळे तालुक्यातील आजी-माजी आमदारा विरोधात मतदारसंघात जोरदार लाट निर्माण झाल्याचेच चित्र दिसून येत आहे.