सिद्धनाथ जन्माष्टमीनिमित्त बलवडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन*

बलवडी ता. सांगोला येथील कुलदैवत सिद्धनाथ यांच्या जन्माष्टमीनिमित्त रविवार दिनांक 17 नोव्हेंबर ते रविवार दिनांक 24 नोव्हेंबर अखेर नाथाच्या मंदिरात नवनाथ ग्रंथाचे सामुदायिक वाचन सोहळा तसेच सप्ताहात कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पारायण मार्गदर्शक हनुमान मंदिर कथा कथन मंडळ व हरिपाठ व किर्तन 7 पांडुरंग वारकरी संस्था धामणी तासगाव यांची राहील. सप्ताहात दररोज रात्री नऊ ते अकरा हरिकीर्तन होईल.
रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी ह. भ. प. शंभुराज महाराज टिकोळे बाल कीर्तनकार यांचे रात्री हरी किर्तन, सोमवार दिनांक 18 नोव्हेंबर रोजी ह. भ.प. संस्कार महाराज खंडागळे यांचे हरिकीर्तन, मंगळवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी ज्योतीताई घनाडे यांचे हरिकीर्तन, बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी समाज प्रबोधनकार प्रा. निलेश महाराज कोरडे यांचे हरिकीर्तन, गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी समाज प्रबोधनकार संग्राम बापू भंडारे यांचे हरिकीर्तन, शुक्रवार दिनांक 22 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. समाज प्रबोधनकार गणेश महाराज डांगे यांचे हरिकीर्तन, शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. समाज प्रबोधनकार विकास महाराज देवडे यांचे हरिकीर्तन तर रविवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. समाज प्रबोधनकार आकाश महाराज पाटील यांचे हरिकीर्तन होईल.
शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते पाच गजी ढोल कार्यक्रम तर सायंकाळी पाच वाजता सिद्धनाथ पालखीची सिद्धनाथ मंदिराकडे प्रस्थान व रात्र दहा वाजता विकास महाराज देवडे कीर्तन केसरी यांचे जागर कीर्तन व रात्र बारा वाजता श्रीची फुले टाकण्याचा कार्यक्रम होईल. तसेच रविवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता दिंडी प्रदक्षिणा व सकाळी दहा वाजता आकाश महाराज पाटील यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद वाटप होईल तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धनाथ यात्रा कमिटी व बलवडी ग्रामस्थ तर्फे करण्यात आले आहे.