महाराष्ट्र
महायुतीचे उमेदवार आम. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ रामदासजी आठवले यांची सांगोला येथे जाहीर सभा

सांगोला/ प्रतिनिधी- 253 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदासजी आठवले यांची आज बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता सांगोला मिरज रोडवरील सदानंद मल्टीपर्पज हॉल येथे जाहीर सभा आयोजित केली आहे.
तरी या सभेसाठी शिवसेना ,भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ,रयतक्रांती संघटना या पक्षातील पदाधिकारी, मान्यवर ,कार्यकर्ते व मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीकडून करण्यात येत आहे.