महाराष्ट्र

मुख्याध्यापकांच्या वाढदिवसानिमित्त तरंगेवाडी गावात जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले 301 वृक्षारोपण

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव जागृती व्हावी तसेच पृथ्वीचे तापमान संतुलन ठेवण्यास, वेळेवर पाऊस पडण्यास झाडाचे अन्य साधारण महत्व आहे हे विद्यार्थ्यांच्या लक्षात यावे यासाठी दरवर्षेप्रमाणे चालू वर्षी जि प प्राथमिक शाळा सांगोलकर गवळीवस्ती (तरंगेवाडी) तालुका सांगोला शाळेतील मुख्याध्यापक सुहास कुलकर्णी यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त शाळेतील शिक्षक खुशालद्दिन शेख यांनी स्वखर्चातून 61,000 रुपये किमतीचे 301 करंज व कडूलिंब झाड तरंगेवाडी महसूल गावात मंगळवारी पाच जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्यावतीने लावण्यात आले.

जनावरे न खाणारे देशी करंज व कडुलिंब झाडे लावण्याच्या उपक्रमात तरंगवाडी महसूल गावातील जि प शाळा सांगोलकर गवळीवस्ती, तरंगेवाडी, गावडेवाडी, पवार कोळेकरवस्ती व बंडगरवस्ती शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी भाग घेतला होता. करंज व कडूलिंब झाड उत्कृष्टरित्या जगविणाऱ्या 31 विद्यार्थ्यांना शिक्षक शेख यांच्याकडून स्वखर्चातून जूनमध्ये प्रत्येकी 1000 रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य बक्षीस दिले जाणार आहे. त्या बक्षिसामध्ये शाळेची बॅग, वह्या, पाटी, जेवण डब्बा, पाण्याची बाटली, कंपास हे शैक्षणिक साहित्य मिळणार आहे. दरवर्षी बक्षीस मिळवण्यासाठी विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा लागत असल्याने शंभर टक्के विद्यार्थी झाडे जगवतात.
वृक्षारोपण कार्यक्रमाला जवळा केंद्राचे केंद्रप्रमुख तानाजी साळे, जि प शाळेचे मुख्याध्यापक अशोक शिंदे, रवींद्र मोरे, श्रीमंत गावडे तसेच शाळेतील शिक्षक अण्णा गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश व्हनखंडे यांनी तर आभार खुशालद्दीन शेख यांनी केले.

 

—————-

‘मी दरमहा माझ्या पगारातील पंधरा टक्के रक्कम शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी, शालेय उपक्रमासाठी व वृक्षारोपण करण्यास दरवर्षी खर्च करत असतो म्हणून आज त्या रक्कमेतून मुख्याध्यापक यांच्या वाढदिवसानिमित्त 301 वृक्षारोपण केले.
( खुशालद्दिन शेख, उपशिक्षक जि. प. शाळा सांगोलकर गवळीवस्ती)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button