कोळा जिल्हा परिषद गटातून डॉ बाबासाहेब देशमुख यांना मोठे मताधिक्य देणार- नारायण तात्या पाटील

महविकास आघाडी इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांना कोळा जिल्हा परिषद गटातून मोठे मताधिक्य देणार असल्याचे जुनोनी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य नारायण तात्या पाटील यांनी सांगितले.
कोळा जिल्हा परिषद गटातील पाचेगाव खुर्द, हातीद, हटकर मंगेवाडी, जुजारपूर ,जुनोनी, तिप्पेहळी, किडबिसरी, पाचेगाव बु, गौडवाडी यासह आदी गावात डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांचा झंजावती गाव भेट दौरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व नेते मंडळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना नारायण तात्या पाटील म्हणाले सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळणारा नेता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब देशमुख असून निवडणुकीमध्ये रात्रीचा दिवस करून ताकद देणार आहे. कोरोनासारख्या कठीण काळात तर त्यांचे काम उल्लेखनीय आहेच आणखीनच आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब देशमुख ह्याच्या तालुकाभर भेटीमुळे तेवढे लोकांना भेटून सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखात हजेरी लावल्यामुळे डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात घर केले आहे. माझी जनता माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य त्यांनी कसोटीने पाळले त्यामुळे सर्वसामान्य नागरिक शेतकरी बांधव युवा कार्यकर्ते खंबीरपणे पाठीशी उभे आहे असे सांगितले.
पुढे बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र कोळेकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विश्वास संपादन केला आहे .त्यांच्या विकास पर्वाला वाढता पाठिंबा जनतेतून मिळत आहे. स्व भाई गणपतरावजी देशमुख आबासाहेबांच्या कामाची तुलना कोणत्याही पक्षातील राजकीय नेत्यांच्या कामाशी करता येत नाही.मात्र त्यांच्या कामाचे अनुकरण जर का राजकीय व सामाजीक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी केल्यास त्यांचेही राजकीय सामाजीक क्षेत्रातले काम नक्कीच ऊल्लेखनीय होईल. सांगोल्यामध्ये त्याचाच अनुभव येत आहे. डॉ बाबासाहेब देशमुख हे स्व आबासाहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकुन सामाजीक व राजकीय क्षेत्रामधाये काम करीत आहेत.डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची अभ्यासु वृत्ती,शांत स्वभाव,जनमानसात मिसळण्याची सवय,सतत जनसंपर्क यामुळे तर ते स्व आबासाहेबांच्या विचारावरती काम करीत आहेत त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
गटातील सर्वच गावांमध्ये डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सर्वत्र ठिकाणी प्रचंड गर्दी दिसून आली जनतेचे प्रेम जनतेचा विश्वास प्रत्येक कार्यक्रमात दिसून आला.या कार्यक्रमास कोळा जिल्हा परिषद गटातील सर्व शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.