महाराष्ट्र

सांगोला तालुक्यातील आंबेडकरी संघटनांचा डॉ. बाबासाहेब देशमुख यांना जाहीर पाठींबा

 

सांगोला/प्रतिनिधी – सांगोला तालुक्यातील तमाम आंबेडकरी आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी उभे राहून निवडून आणण्याचे आवाहन करत तालुक्यातील आंबेडकरी संघटनानी जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर व सेक्युलर मुव्हमेंटचे कार्याध्यक्ष भरत शेळके यांनी दिली.
सांगोला तालुक्यातील आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक काल बुधवार दि. 13 रोजी दुपारी 2 वाजता प्रशांत निवास येथे पार पडली.

 

यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर यांनी सांगितले कि, सांगोला तालुक्यातील दलित समाज संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून शेतकरी कामगार पक्षाच्या सोबत आहे. तालुक्यातील विविध जाती धर्मातील सामाजिक सलोखा कायम राखण्यामध्ये शेकापने नेहमीच महत्वाची भूमिका घेतली आहे. म्हणून भविष्यातही असे वातावरण राखण्यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख हेच योग्य उमेदवार असून त्यांना बहुमताने विजयी करावे. त्यानंतर सेक्युलर मुव्हमेंटचे भरत शेळके यांनी सांगितले कि, सांगोला तालुक्यात पुरोगामी विचारांची परंपरा टिकवण्यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी आंबेडकरी समाजाने उभे राहावे व त्यांना मतदान करावे असे आवाहन केले.

सदर बैठकीला माजी उपनगराध्यक्ष प्रशांत ( पप्पू) धनवजीर, किशोर बनसोडे, सूतगिरणीचे संचालक बाळासाहेब बनसोडे, मार्केट कमिटीचे व्हा. चेअरमन माणिक वाघमारे, वंचितचे तालुकाध्यक्ष विनोद उबाळे, पं.स.चे माजी सभापती राहुल काटे, शहाजी गडहिरे, दीपक बनसोडे, विनोद चंदनशिवे, सुनील जगधने, स्वप्नील सावंत, काकासो होवाळ, दिलीप सुतार, बाबासाहेब भजनावळे, पवन गाडे, जितेंद्र गडहिरे, रावसाहेब कांबळे, प्रशांत कांबळे, नंदू मोरे, दगडू गायकवाड, दीपक होवाळ, मुरलीधर तोरणे, सुरेश चंदनशिवे, सुनील काटे, सुनील कांबळे( लकी), विकास साबळे, विकास गडहिरे, सचिन उबाळे, समाधान होवाळ, सुर्यकांत शेळके, सुरेश बाबर, चंद्रशेखर माळगे, नंदकुमार चंदनशिवे, खंडेराव लांडगे, नितीन वाघमारे, प्रवीण सुर्यगण, प्रवीण भोरकडे, उद्धव सरतापे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button