महाराष्ट्र

सांगोला:निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर असलेल्या 16 कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

सांगोला प्रतिनिधी – दिनांक 27/ 10 /24 व 28/ 10 /24 रोजी 253 सांगोला विधानसभा निवडणूक कामासाठी केंद्राध्यक्ष व सहाय्यक केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी एक, दोन, तीन यांचे प्रशिक्षण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन टाऊन हॉल व विद्यामंदिर प्रशाला ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे दोन सत्रामध्ये ठेवण्यात आले होते

 

त्यावेळी प्रशिक्षणास 16 अधिकारी यांनी प्रशिक्षणास गैरहजर राहिल्याने निवडणूक कामात हलगर्जी पणा केल्याबद्दल व सदर कर्मचारी गैरहजर असल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button