चिणके येथे विविध विकास कामाचे उद्घाटन, वृक्ष लागवड व गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न

चिणके ता. सांगोला येथे विविध विकास कामाचे उद्घाटन, वृक्ष लागवड व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला. अध्यक्षस्थानी माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख हे होते.
चिणके हे नाथाचे गाव आहे व महाराष्ट्रात चांगले गाव आहे यासाठी वैजनाथ काका झाडे मागा आपण ती देऊ परंतु आपल्या गावाचे प्रथम आपण सर्वांनी कौतुक करा व गावाच्या विकासासाठी सहकार्य करू असे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना मत व्यक्त केले. सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रजनन करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक उपसरपंच मोहन मिसाळ यांनी केले. तर चिनके गावात आल्यावर ऊर्जा मिळाली व जेथे जेथे आमची मदत लागेल ती करू व अभ्यासिका कॉम्प्युटर वाईज करा तसेच इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करा व चांगल्या कामासाठी आपण निधी देऊ असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यावेळी मत व्यक्त केले. तर चिनके गावात आजी-माजी सैनिकासाठी मोफत कार्यालय दिले व त्यामुळे गावात चांगला वारसा आहे व हे करीत असताना राजकारणाच्या चपला बाहेर सोडा व गावासाठी मंगल कार्यालय प्रस्ताव द्या त्यास मंजुरी देऊ असे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी यावेळी सांगितले. लोकवर्गणीतून विकास कामे करणारी चिणके हे पहिले गाव आहे व या गावात नेतेमंडळीचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला व सर्वजण सहकार्य करतील असे मत प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके यांनी यावेळी व्यक्त केले. तर ज्या गावात सर्व पक्षाचे नेते मंडळी एकत्र काम करताना दिसतात त्या गावचा विकास निश्चित होणार असे हे चिनके गाव आहे असे डॉक्टर पियुष दादा साळुंखे पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद घुगे, युवा नेते जगदीश बाबर, डॉक्टर राजकुमार मिसाळ यांनीही मत व्यक्त केले.
सदर प्रसंगी लोकनेते बाबुराव भाऊ गायकवाड, वैजिनाथ काका घोंगडे, युवा नेते यश राजे साळुंखे पाटील, योगेश दादा खटकाळे, विजय दादा येलपले, ऍड गजानन भाकरे, अभिजीत नलवडे, महेश नलवडे, मोहन अनपट, उपसरपंच पोपट शेठ यादव, गटविकास अधिकारी यु. के. कुलकर्णी, अभियंता नवनाथ शिंदे, सरपंच नाथा खंडागळे, ग्राम. सदस्य जालिंदर मिसाळ, बाळासाहेब मिसाळ, लक्ष्मण मिसाळ, तानाजी मिसाळ, महेश मिसाळ,, उमेश मिसाळ, केशव मिसाळ, संजय शितोळे, सुभाष पाटील, मेजर बाळासो पाटील, शंकर मिसाळ व सहकारी, तानाजी मिसाळ, प्रा. जालिंदर मिसाळ, सुनील भोरे, विनायक पाटील, ग्रामस्थ, युवा वर्ग, विविध पक्षाचे पदाधिकारी, विद्यार्थी, पालक, ग्राम. कर्मचारी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांचे आभार मा. सरपंच विनायक मिसाळ यांनी मानले.



