म्हसोबा यात्रेत तोडलेली वीज दिपकआबांच्या पुढाकाराने पुन्हा जोडली

संपूर्ण महाराष्ट्रात जनावरांच्या आजारासाठी प्रसिद्ध असणारी जवळा ता. सांगोला येथील श्री म्हसोबा यात्रा कोरोनाच्या अडचणी मुळे दोन वर्षांनी पुन्हा एकदा त्याच उत्साहाने भरली आहे. या यात्रेला महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून तसेच कर्नाटकातील विजापूर बेळगाव आणि अन्य भागातून हजारो भाविक आणि व्यापारी येतात. दोन वर्षांनी भरलेली यात्रा यंदा त्याच उत्साहाने भरली असताना अचानक वीज वितरण कंपनीने यात्रेतील एकही दुकानदार किंवा व्यापारी बांधवाने महावितरणकडे विशिष्ठ अनामत रक्कम ठेवून अधिकृत वीज जोडणी केली नाही म्हणून सर्वांचीच वीज तोडली. आणि जणू संपूर्ण यात्रा काळोखात बुडून गेली. दोन वर्षांनी होणारी यात्रा यंदा वीज वितरण कंपनीने कनेक्शन बंद केल्याने होणार की नाही..? अशी परिस्थिती निर्माण झाली असता ही बाब जनसेवेसाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांना जवळा येथील प्रसिद्ध व्यापारी शहाजहान अत्तार यांनी कळवली . व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्षमुळे हजारो लाखो भाविक भक्तांच्या आनंदावर विरजण पडणार की काय…? अशी परिस्थिती निर्माण झाली असताना आबांनी तात्काळ समयसूचकता दाखवत वीज वितरण कंपनीचे अधिकारी गोसावी आणि त्यांचे कर्मचारी यांच्याशी चर्चा करून जवळा येथील म्हसोबा यात्रा हा येथील लोकांच्या केवळ उदरनिर्वाहाचा नव्हे तर अस्मितेचा विषय आहे. “जवळ्याचा म्हसोबा” हे सांगोला तालुक्यातील नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे आराध्य दैवत आहे. असंख्य लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हासोबाची यात्रा दोन वर्षांनी पुन्हा भरत आहे. या यात्रेत जनावरांचा बाजार, खेळणी, भांडी कपडे मिठाई लहान मुलांचे पाळणे खाद्य पदार्थांचे स्टॉल आदी दुकानदार आपली असंख्य स्वप्न घेऊन त्यांनी यात्रेत आपली दुकाने थाटली आहेत. म्हणून वीज वितरण कंपनीने नियमावर बोट ठेवून भाविकांच्या श्रद्धा आणि व्यापारी बांधवांच्या स्वप्नांचा चुराडा करू नये पुढील वर्षीच्या यात्रेत प्रत्येक व्यापाऱ्यांनी यात्रा सुरू होण्यापूर्वी स्वतःहून अधिकृत वीज जोडणी करून घ्यावी त्यासाठी प्रसंगी आपण पुढाकार घेऊ अशी दिपकआबांनी भूमिका घेऊन वीज वितरण कंपनीला पुन्हा त्यांना वीज जोडणी सुरू करावी अशी विनंती केली. सामान्य भाविक भक्त आणि महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या व्यापारी बांधवासाठी इतकी स्वच्छ आणि प्रामाणिक भूमिका घेणाऱ्या दिपकआबांच्या विनंतीचा मान राखत वीज वितरण कंपनीने पुन्हा सर्व व्यापारी आणि अनेक छोट्या मोठ्या दुकानदार व व्यावसायिकांना वीज देण्याची तयारी दर्शवली आणि तात्काळ कार्यवाही केली त्यामुळे पुन्हा एकदा भाविक भक्त तसेच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. दिपकआबांनी शिष्टाई केल्यामुळेच म्हसोबा यात्रेत पुन्हा एकदा रोषणाई संचारली असल्याची भावना यात्रेतील भाविक भक्त आणि व्यापारी यांच्यातून व्यक्त होऊ लागली आहे.
संपूर्ण सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी घेऊन तालुक्याला “तिमिरातून तेजाकडे” घेऊन जाणाऱ्या मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या “न्यायाचे प्रतीक” असणाऱ्या जवळा येथील वाड्यावर आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला दिपकआबाकडे योग्य न्याय मिळतोच हे म्हसोबा यात्रेतील या प्रसंगामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
शहाजहान अत्तार ; व्यापारी जवळा