जनतेची सेवा करण्यासाठी नाही तर मलिदा मिळवण्यासाठी दोघे जण निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत- नंदकुमार शिंदे
डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ जवळे येथे रेकॉर्ड ब्रेक सभा संपन्न.

सांगोला:-सांगोला तालुक्यात गेल्या पाच वर्षात हजारो कोटी निधी आणला असे सांगत आहेत.जय विरू जोडीचा 60 40 चा फॉर्म्युला तुम्ही आम्ही पहिला. दोघांनीही पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसे मिळविला.गेल्या पाच वर्षात जाणीव पूर्वक दोघांनी सर्वसामान्य जनतेवर अन्याय केला.जनतेची सेवा करण्यासाठी नाही तर मलिदा मिळवण्यासाठी दोघे जण निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत. दोघांकडे निष्ठा ही चीजच नाही तर तुमच्याशी काय प्रामाणिक राहणार असा सवाल मा.जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार शिंदे यांनी उपस्थित केला.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ.भाई बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ जवळे येथील अहिल्या चौकात भव्य जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी नंदकुमार शिंदे बोलत होते. व्यासपीठावर डॉ.अनिकेत देशमुख, भैया घुले-सरकार , प्रताप देशमुख, सुदर्शन घेरडे, बापूसाहेब ठोकळे, भरत शेळके, सोमा आबा मोटे, अक्षय दादा बनसोडे, डॉ.निकिताताई देशमुख, विनायक कुलकर्णी, किसन माने, राजेंद्र गावडे, ,आनंदा यमगर, प्रदीप मिसाळ, महेश बंडगर, मायाप्पा यमगर, उपसरपंच भारत सांगोलकर, नितीन गव्हाणे, पिंटू दादा पुकळे, संगम धांडोरे यांच्यासह मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना नंदकुमार शिंदे म्हणाले की, सांगोला तालुक्याला दशा आणि दिशा देण्यासाठी ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. गेल्या 5 वर्षात तालुक्यात विकास कसा चालू होता ते आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आलोय आहे. आबासाहेबांनी 60 वर्षे जसे राजकरण केले तसेच राजकारण सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.अनिकेत देशमुख यापुढील काळात करतील असे विश्वास देत शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व भ्रष्टचार, गुंडगिरी संपविण्यासाठी शेकाप च्या पाठीमागे खंबीर उपस्थित राहावे असे आवाहन करत डॉ.बाबासाहेब देशमुख यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले.
यावेळी डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले, महाविकास आघाडीने आम्हाला पाठिंबा दिला असून 10 पेक्षा जास्त अपक्ष उमेदवारांनी डॉ.बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. सन 2024 ची विधानसभेची ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी आहे. गेल्या 60 वर्षात आबासाहेबांनी राजकारण, समाजकारण केले आहे. सर्व जाती, जमातीतील लोक एकत्र येण्यासाठी स्व.आबांनी काम केलं आहे.आबासाहेबांचे पुरोगामी विचार आपण सर्वजण असेच पुढे चालू ठेवणार आहोत. येणार्या20 तारखेला शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना प्रचंड बहुमताने विजयी करूया,असे आवाहन केले.
यावेळी प्रतापराव देशमुख, विनायक कुलकर्णी गुरुजी,सुदर्शन घेरडे, बापूसाहेब ठोकळे, प्रदीप मिसाळ, ललित बाबर सर यांनी आपली मनोगते व्यक्त केली.जवळे येथील अहिल्या चौक येथे झालेल्या रेकॉर्ड ब्रेक सभेसाठी जवळे पंचक्रोशीतील चार वाड्या तसेच घेरडी परिसरातील हजारो युवक कार्यकर्ते,जेष्ठ नेते मंडळी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला देशमुख बंधूंचे हलगीच्या कडकडाट जंगी स्वागत करण्यात आले. सभेच्या शेवटी घेरडी येथील काही युवक कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.
—————————————–
आमच्याकडून काही चुका झाल्या असतील पण आम्हाला पदरात घ्याव…..
शेकाप हा मत खाणारा पक्ष नसून मताधिक्य घेणारा पक्ष आहे. शेकाप तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी टिकवून ठेवला आहे. आम्ही राजकारण समाजकार्य करू पण लालबावटा खांद्यावरून कधीही उतरु देणार नाही. जवळे गाव व पंचक्रोशीतील चार वाड्या वरती 60 वर्षात स्वर्गीय आबासाहेबांनी तुम्हाला संरक्षण देण्याचे काम केले आहे. निश्चितपणे मागच्या तीन-साडेतीन वर्षांमध्ये राजकारण व समाजकारण करीत असताना आमच्याकडून काही चुका झाल्या असतील पण तुम्ही आम्हाला पदरात घ्यावं असे आवाहन केले.
डॉ.बाबासाहेब देशमुख