एक वेळ संधी द्या, पाच वर्षे सालगडी म्हणून काम करू…- दीपक आबा साळुंखे पाटील

आज पर्यंत तीस वर्षे आपण शेतकरी कामगार पक्षास व बापूस मदत केली परंतु काही उपयोग झाला नाही त्यामुळे जनतेचा विचार घेऊन आपण शिवसेनेत प्रवेश केला व कोणतेही काम करत असताना जात पात, पक्ष कधीही बघितला नाही व यापुढेही बघणार नाही परंतु येत्या 20 तारखेस मशाल चिन्हावर बोट दाबून विजयी करा व एक वेळ संधी देऊन पहा, आपण जनतेची पुढील पाच वर्षे सालगडी म्हणून काम करू असे मत सांगोला विधानसभेचे उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी वझरे ता. सांगोला येथे प्रचार सभेत केले.
सध्या 40 ते 45 वर्षे झाली तरी तरुणाची लग्न नाहीत व मोकाट तरुण वाळूच्या मुळे व्यसनाधीन झाला परंतु आपण निवडून आल्यानंतर पाण्याचा प्रश्न, माण नदीस वर्षातून तीन वेळा पाणी, रेशन कार्ड व मूलभूत प्रश्न तसेच पाच ठिकाणी एमआयडीसी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ व याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी प्रश्न सोडवण्याचे अभिवचन दिले आहे. तसेच गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सांगोल्या सलपाटे मारू देणार नाही त्यांचे काम गावातच करू परंतु आपले लाख मोलाचे मत देऊन विजय करा अशी आवाहनही दीपक आबा साळुंखे पाटील यांनी यावेळी केले.
दीपक आबांनी शेतकरी कामगार पक्षस अकरा वेळा व बापू एक वेळेस विजय करण्यासाठी मदत केली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही तसेच जात-पात व पक्ष पार्टी न पाहता आबांनी काम केले अशा कार्यकर्तव्य कुशल नेतृत्वास विजयी करा असे मत मा. नगराध्यक्ष प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके यांनी यावेळी मत व्यक्त केले. तर सांगोला तालुक्यात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक, अनकढाळ टोल नाका मोफत तसेच मातंग समाजातील तरुणांना एमआयडीसी आणून रोजगार उपलब्ध करून द्या या मागण्या मान्य झाल्याने आपण लहुजी पॅंथर सेनेचा दीपक आबा साळुंखे पाटील यांना पाठिंबा दिला व त्यांनाच विजयी करा असे मत लहुजी सेनेचे अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे यांनी व्यक्त केले. यावेळी माजी प्राचार्य के. वाय. पाटील, लहुजी सेनेचे सचिव अभिषेक कांबळे, महेश वाघमारे, बलवडीचे सदाशिव गायकवाड, आबा पवार, दादासो हरिहर यांनीही आबांना विजयी करण्याचे आवाहन केले.
सदर प्रसंगी माजी सरपंच विनायक मिसाळ, महादेव पवार, अशोक पाटील, उपसरपंच क्ष्मण वाघमारे, ग्राम. सदस्यां सौ सोनाबाई पाटील, सुरेश रेड्डी, दत्तात्रय रेड्डी, सिद्धेश्वर रेड्डी, शरद गुरव, प्रकाश पाटील, बाळू पाटील, बापू वाघमारे, सचिन वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे, काका वाघमारे, प्रा .डी.के. पाटील, दत्तात्रय वाकडे, अण्णा वाकडे, गंगाराम रेड्डी, भैया काजी, बापू पवार, मेघराज लिगाडे, प्रा. सूर्यकांत शिंदे, दत्तात्रय शिंदे, सचिन दुकटे, गणेश वाघमारे, दीपक शिंदे, गोरख शिंदे, प्रशांत कदम, सागर दीक्षित, राजू पाटील, शरद रेड्डी, भाऊ यादव, नितीन यादव, शंकर गावडे, लक्ष्मण रेड्डी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी काळया मळयामधील युवक, कार्यकर्ते तसेच वाहन चालक संघटनेचे सचिन इंगोले व पदाधिकारी यांनी दीपक आबांना पाठिंबा दिला व ऊबाठा गटात प्रवेश केला. शेवटी सर्वांचे आभार आबा पवार यांनी मानले.



