उत्कर्ष विद्यालयात 78 वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न…

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयात स्वतंत्र भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या परंपरेनुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादी स्थान पटकाविलेल्या कु. वेदांगी दत्तात्रय शिंदे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाने कवायत सादर केली.
क्रीडा शिक्षक गोतसूर्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योगा प्रात्यक्षिके तसेच कबड्डी प्रात्यक्षिक सादर केले.

विविध क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा याप्रसंगी पार पडला. रणजित केदार (ठाणे ग्रामीण पोलीस), श्रीया कुलकर्णी (तबला अलंकार प्रथम), स्नेहल सुतकर (कामगार अंमलबजावणी सहाय्यक – उत्तर प्रदेश )गणेश मडके(सेट) या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे डॉ संजूताई केळकर तसेच संस्थापदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
15 ऑगस्ट निमित्त रोटरी क्लब आयोजित नृत्य स्पर्धेत सहभागी झालेल्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.

शेवटी खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्षा माननीय संजुताई केळकर, संस्था उपाध्यक्ष देशपांडे मॅडम, खजिनदार डॉ. शालिनी कुलकर्णी, शालेय विभाग सचिव दमयंतीताई खर्डीकर तसेच संस्था पदाधिकारी, तिन्ही विभागाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button