फॅबटेकच्या प्रशांत कोळेकर यांची कनिष्ठ अभियंता पदी  निवड

सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ,फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील माजी विद्यार्थी प्रशांत कोळेकर यांची जिल्हा परिषद, वर्धा येथे कनिष्ठ अभियंता पदी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. आर.बी.शेंडगे यांनी दिली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन करून स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील संधींबद्दल ग्रामीण भागात होत असलेली जनजागृतीनागरी सेवेच्या माध्यमातून मिळणारी पदेप्रतिष्ठा तसेच विविध आव्हाने झेलत समाजसेवेचा वारसा अविरतपणे पुढे चालवण्याची दुर्दम्य इच्छाशक्तीइंटरनेट व त्यांच्याशी संलग्न अनुप्रयोगाच्या माध्यमातून भौतिक अडथळे दूर होऊन फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मधील दर्जेदार अभ्यास साहित्याची उपलब्धता तसेच प्रशासकीय सेवेमध्ये मिळणारी प्रतिष्ठात्याभोवती असणारे आकर्षणत्यायोगे मिळणारी समाजप्रतिष्ठा व नवोदित अधिकारी मंडळींनी वास्तवाशी सांगड घालत आपल्या भाषणाच्या माध्यमातून मांडलेली एकांगी यशोगाथा आदी गोष्टींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे आकर्षित झाले आहेत आणि ही निश्‍चितच स्वागतार्ह बाब आहे, असे कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे यांनी सांगितले.

फॅबटेक मधील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेच्या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन करून त्यांच्या यशाची गुरुकिल्ली हि कष्ट आणि अभ्यासाचे सातत्य या बद्दल व परीक्षेच्या मुद्यावर व महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती जाते. तसेच योग्य पुस्तकांची  निवड कशी करायची याची माहिती देऊन अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धात्मक परीक्षा  माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना  दिली जाते ,असे सिव्हील इंजिनिअरिंग विभागाचे  ट्रेनिंग  अँड  प्लेसमेंटचे समन्वयक प्रा.शरद आदलिंगे यांनी सांगितले.

स्पर्धा परीक्षेत यशाची परंपरा कायम राखली म्हणून संस्थेचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर, मॅनेजिंग  डायरेक्टर मा. डॉ. अमित रुपनरकार्यकारी संचालक मा.श्री दिनेश रुपनर,यांच्या मार्गदर्शनाखाली व  कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय आदाटे, टेक्निकल प्राचार्य डॉ .रवींद्र शेंडगे, सिव्हील इंजिनिअरिंग चे विभाग प्रमुख प्रा. माळी एस.एम, डॉ. वागीशा माथाडा, प्रा.शरद आदलिंगे, प्रा.अमोल मेटकरी, प्रा. दुधाळ के. , प्रा.विशाल भाकरे यांनी त्यांचा सत्कार करून पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button