crime

अन्न व औषध विभागाकडून मोठी कारवाई ; दोन वाहनासह 26 लाख 12 हजार अन्न पदार्थाचा साठा जप्त

HTML img Tag Simply Easy Learning    

दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी दक्षता विभागाचे सह आयुक्त डॉ.राहूल खाडे यांच्याकडून प्राप्त गोपनिय माहितीच्या अनुषंगाने पुणे विभागातील विशेष भरारी पथकाचे सहायक आयुक्त देसाई यांना तात्काळ बार्शी येथे जाण्यास सांगितले. त्यावरून देसाई हे सर्व अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील, नंदीनी हिरेमठ व उमेश भुसे यांच्यासह बार्शी तालुक्यातील मु.पो. कोरफले, ता बार्शी, जिल्‍हा सोलापूर या ठिकाणी हजर झाले. सदर ठिकाणी नेताजी तानाजी बरडे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एमएच-12 एलटी-9853 व महिंद्रा पिकअप वाहन क्र.-13 एएन-3955 हे दोन्ही वाहने संशयरित्या थांबल्याचे सदर पथकास आढळून आले.

त्यानंतर सदर पथकाने दोन्ही वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये बादशहा गुटखा या प्रतिबंधित अन्न पदार्थाचे एकूण 35 पोती, किंमत रूपये 16 लाख 12 हजार 800 रूपये तसेच महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एमएच-12, एलटी 9853 किंमत रूपये 5 लाख व महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एमएच-13 एएन-3955 किंमत रूपये 5 लाख असे एकूण एकत्रित किंमत रूपये 26 लाख 12 हजार 800 चा मुद्देमाल आढळून आला.

त्यानंतर सदर प्रकरणी रेणुका पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पुढली कारवाई घेऊन बार्शी तालुका पोलिस स्टेशन, बार्शी येथे रात्री उरिशपर्यत फिर्याद दाखल करण्याचे कामकाज चालु होते. तसेच उपरोक्त प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन जप्त करूण ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई दक्षता विभागाचे सह आयुक्त डॉ.राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथकाचे सहायक आयुक्त देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील, श्रीमती नंदिनी हिरेमठ व उमेश भुसे यांच्या पथकाने पुर्ण केली. असे अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त देसाई यांनी सांगीतले.
00000

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!