सांगोल्यात ११ ऑगस्ट रोजी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन

 

सांगोला ( प्रतिनिधी): राजर्षी शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, चिकमहुद यांच्या वतीने तसेच पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संकल्पनेतून सांगोल्यात रविवार ११ ऑगस्ट रोजी इयत्ता पाचवी ते पदवी पर्यंतचे शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. या नोकरी महोत्सवात ६० नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत.

रोजगार निर्मिती, सक्षम कुशल रोजगारक्षम युवा निर्मितीसाठी राजर्षी शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ चिकमहूद यांच्या वतीने तसेच पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संकल्पनेतून नोकरी आपल्या दारी अंतर्गत इयत्ता पाचवी ते पदवी पर्यंतचे शिक्षण झालेल्या बेरोजगार तरुणांसाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ११ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत हर्षदा लॉन्स, मिरज रोड सांगोला या ठिकाणी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान नोकरी पूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार ८ ऑगस्ट रोजी स्वेरी इंजीनियरिंग कॉलेज गोपाळपूर, कर्मयोगी कॉलेज शेळवे, शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज सांगोला, सह्याद्री फार्मसी कॉलेज मेथवडे तर शनिवार १० ऑगस्ट रोजी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला व दीपकआबा साळुंखे पाटील कॉलेज कोळा या ठिकाणी नोकरीपूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबिर संपन्न होणार आहे. या नोकरी महोत्सवात बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, झोमॅटो, अक्सिस बँक, डॉ.रेड्डीज फाऊंडेशन, इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक, फुकोकू इंडिया प्रा.लि., क्विझ कॉर्प लि., जिनियस ग्लोबल, पॉलीबाँड इंडिया लि., रॉयल इन्फोटेक, यशस्वी ग्रुप, साई श्रद्धा इंटरप्रायजेस, युवाशक्ती फाऊंडेशन, एक्साईड बॅटरी, युनो मिंडा लि., इलेक्ट्रो टेक्नॉलॉजी लि., युनीकेअर हेल्थ केअर, सुमित फॅसिलिटीज लि., डी.एम.सी.फिनिशिंग प्रा.लि. यासह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, बँकिंग, सेल्स, रिटेल इंडस्ट्रीज, हॉटेल इंडस्ट्रीज, फार्मा, सिक्युरिटी, मार्केटिंग, ऑटोमोबाईल्स क्षेत्रातील नामवंत ६० कंपन्या सहभागी होणार आहेत. गरजू युवकांनी या नोकरी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांना या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

———–
नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना क्यू आर कोड स्कॅन करावा. किंवा https://maharashtrajobfair.com/shahajibapupatil या वेब पेजवरील फॉर्म भरून ऑनलाईन नोंदणी करावी. ज्या इच्छुकांना ऑफलाईन नोदणी करावयाची आहे, त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयातील फॉर्म भरून द्यावेत असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button