महाराष्ट्र

रेकॉर्डब्रेक निधी मिळवण्यात आम.शहाजीबापू पाटील आघाडीवर– माजी .आम. प्रशांतराव परिचारक

सांगोला /प्रतिनिधी-राज्यातील महायुती सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना आखल्या. राज्यात व देशात एकाच पक्षाचे व विचाराचे सरकार सत्तेत असल्यास मोठ्या प्रमाणावर विकास कामे पूर्ण होतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रा मध्ये अनेक प्रकारची नेत्रदीपक अशी कामे करीत विविध प्रकारच्या योजना राबवल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम.शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करा त्यांना नामदार करू असे सांगोल्यातील सभेमध्ये जाहीर केले .राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येईल व विकास कामांचा रथ गतीने पुढे जाईल. सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी रेकॉर्डब्रेक निधी आणण्यामध्ये शहाजीबापू पाटील आघाडीवर आहेत. असे प्रतिपादन‌माजी आम ,चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी केले.

 

 

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आम.शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2024 रोजी भाळवणी येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत आम. प्रशांतराव परिचारक बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भगवानराव चौगुले, शिवाजीराव बाबर, शिवाजीअण्णा गायकवाड, नवनाथभाऊ पवार ,श्रीकांतदादा देशमुख, दादासाहेब लवटे, राजश्रीताई नागणे पाटील, ॲड. महादेव कांबळे, दीपक पवार, संजय मेटकरी,विलास देठे, नवनाथ माने, रणजीत जाधव, महादेव आयरे ,समाधान सुरवसे, अण्णासाहेब गवळी, प्रकाश देठे, नाना मोरे, हरिभाऊ शिंदे, बालाजी बागल, अविंदा गायकवाड, सुनील पाटील, धैर्यशील निंबाळकर, . तानाजी वाघमोडे, आबाजी शेंडगे, किरण दानोळे, सचिन भोसले, रामभाऊ ढोबळे, राहुल पाटील, धनंजय काळे, हणमंतदादा सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करीत शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

पुढे बोलताना आम. प्रशांतराव परिचारक म्हणाले, भाळवणी गटातील भंडीशेगाव ,धोंडेवाडी ,जैनवाडी आदी गावातील प्रचारसभेस प्रचंड प्रतिसाद मिळाला. पूर्वी आमदारांना 30 ते 40 कोटी रुपयांचा विकास निधी मिळायचा. परंतु महायुती सरकारने सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी 5 हजार कोटीहून अधिक निधी देऊन विधानसभा मतदारसंघाचा कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांक आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक महत्त्वकांक्षी योजना राबवल्या. केंद्रात व राज्यात एकाच विचाराचे सरकार असेल तर जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी चांगली संधी मिळते. केंद्र व राज्य सरकारने रस्ते , शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या योजना राबवल्या, लाडकी बहिण योजना, केंद्राची व राज्याची किसान सन्मान निधी योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना, शेतकऱ्यांसाठी वीजबिल माफी योजना, मुली व महिलांसाठी विकासाच्या योजना, प्रत्येक घराला 300 युनिटपर्यंत मोफत वीज, प्रधानमंत्री आवास योजना, आधुनिक पद्धतीच्या रस्त्यांचे जाळे निर्माण केले .यासारख्या अनेक लोककल्याणकारी योजना सरकारने राबवल्या. राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेवर आणण्यासाठी व शहाजीबापूंना आम. करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून विक्रमी मताधिक्य द्या. आम. शहाजीबापू पाटील यांना नामदार होण्याची संधी मिळणार आहे. दिलेला शब्द पाळणाऱ्या महायुती सरकारला पुन्हा एकदा सत्तेवर आणा असे आवाहन पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व माजी आम. प्रशांतराव परिचारक यांनी आम.शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ भाळवणी येथील सभेमध्ये केले

 

यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आम.शहाजीबापू पाटील म्हणाले राज्यातील महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगोला तालुक्यासाठी 5 हजार कोटीहून अधिक निधी दिला. या निधीच्या माध्यमातून सांगोला तालुका व पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटात नेत्र दीपक अशी विकास कामे केली. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. पूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही सहभागी होतो. त्यावेळी राज्याची प्रगती ठप्प होती. त्यानंतर सरकारमध्ये राजकीय उठाव घडला व राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले. सव्वा दोन वर्षाच्या काळात तालुक्यात विकासकामे करून परिवर्तन केले. दुष्काळी सांगोला तालुक्याचा कलंक पुसण्यासाठी शेतीच्या पाण्याच्या अनेक योजना मार्गी लावल्या .तसेच पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी एकही गाव वंचित राहणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले. सांगोला व पंढरपूर तालुक्यातील भाळवणी गटाच्या विकासासाठी व तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी प्रचंड मोठी एमआयडीसी व उद्योगधंदे या भागात आणून तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प केला आहे. भाळवणी गटासाठी व सांगोला तालुक्यातील काही भागासाठी जिहे -कटापूर योजनेतून 1 टीएमसी पाणी मंजूर केले व उजनीचा निरा उजवा कालवा या दोन्ही योजनेच्या माध्यमातून भाळवणी गटासाठी बारमाही पाणी देण्याचे नियोजन आखले आहे. सांगोला तालुक्यातील माण व कोरडा नदीला कालवाच्या दर्जा दिला त्याप्रमाणे कासाळ ओढ्याला कालव्याच्या दर्जा देण्याचा निर्धार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारख्या योजना यापूर्वीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्याने राबवल्या नाहीत. शेतकऱ्यांची वीज बिल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच केली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचा सोन्यासारखा विकास करेन .बारामती सारखा सांगोला व भाळवणी गटाचा विकास करण्यासाठी या निवडणुकीत विक्रमी मताधिक्य देऊन विकासासाठी पाच वर्षे पुन्हा एकदा संधी द्यावी. मुख्यमंत्र्यांनी मला मंत्री करण्याचा शब्द दिला आहे. माजी. आम. प्रशांतराव परिचारक यांनाही मंत्रिमंडळात मंत्री पदाची संधी मिळणार आहे. त्यासाठी भाळवणी गटातील पांडुरंग परिवार व विठ्ठल परिवार यांनी विक्रमी मताधिक्य देण्याचा संकल्प केला आहे असे मत आम . शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केले.

———-

सांगोला विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आम.शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ भाळवणी गटातील प्रत्येक गावातून महायुतीच्या पदाधिकाऱी कार्यकर्ते. मतदार बंधू -भगिनींचा उस्फुर्त प्रतिसाद. प्रत्येक गावात शहाजीबापूंचे फटाक्यांची आतिषबाजी व फुलांची उधळण करीत जल्लोषात स्वागत केले. भाळवणी गटात आम. शहाजीबापू पाटील यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याने त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा महायुतीच्या नेते मंडळींचा संकल्प. पांडुरंग परिवार व विठ्ठल परिवाराकडून आम.शहाजीबापू पाटील यांना खंबीर साथ देण्याचे वचन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button