आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे नशामुक्त भारत अभियानाचे कार्य गौरवास्पद-रो.इंजि.विकास देशपांडे

दिवसेंदिवस समाजामध्ये व्यसन ही एक गंभीर समस्या बनू लागली आहे.व्यसनामुळे युवा वर्ग भरकटू लागला आहे.व्यसनामुळे व्यसनाधीन व्यक्तीचे वैयक्तीक तर नुकसान होतेच पण त्याचबरोबर त्याचे कौटूंबिक आणि सामाजिक नुकसानसुध्दा मोठ्या प्रमाणात होत असते.या सर्व गोष्टींचा विचार करून डॉ.संदिप तांबारे यांनी नशामुक्त भारत अभियानाचे जे कार्य हाती घेतले ते अंत्यत गौरवास्पद आहे,असे गौरवोदगार सांगोला रोटरी क्लबचे अध्यक्ष इंजि.विकास देशपांडे यांनी व्यक्त केले.

आयुष व्यसनमुक्ती केंद्रात दाखल उपचारात सहभागी असलेले परिवर्तनवादी मित्र उपचार पूर्ण करून हसतहसत व विश्वासाने घरी जातात.या परिवर्तनवादी मित्र व त्यांच्या कुटुंबीयांसाठी दर रविवारी कुटुंब-पालक मेळावा आयोजित करण्यात येतो.आयुष व्यसनमुक्ती व संशोधन केंद्र जामगाव येथे हा कुटुंब मेळावा मागील रविवारी संपन्न झाला.आयुष व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आयोजित केलेल्या परिवर्तनवादी मित्रांच्या कुटूंबियाच्या कुंटुब पालक मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून रो.इंजि.देशपांडे बोलत होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ.संदिप तांबारे हे होते.तर व्यासपीठावर सांगोला रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ.मच्छिंद्र सोनलकर, मा.नगरसेवक दिपकराव चोथे,पत्रकार विनायक मस्के ,व्यसनमुक्ती केंद्राचे मेडिकल ऑफिसर डॉ.केंडे,केंद्राचे एच आर मॅनेजर गणेश तांबारे आदी मान्यवर उपस्थित होते.

व्यसनमुक्तीसाठी या केंद्रामध्ये दाखल झालेल्या परिवर्तनवादी मित्रानी यापुढच्या काळात मागील काळामध्ये आयुष्यात घडलेल्या वाईट प्रंसगाला हद्दपार करून व्यसनमुक्त जगण्याचा सकारात्मक विचार करून आपल्या कुटुंबाला आनंद मिळवून द्यावा, असे सांगून इंजि.देशपांडे यांनी सांगोला रोटरी क्लब आयुष व्यसनमुक्ती केंद्राच्या सहकार्याने नशामुक्त भारत अभियान सांगोला तालुक्यात यशस्वीपणे राबविणार असल्याचे सांगितले.

व्यसनातून बाहेर येण्यासाठी चे वेगवेगळे तंत्र आहेत त्यापैकी कौटुंबिक थेरपी म्हणजेच कुटुंब मेळावा होय.आयुष व्यसनमुक्ती केंद्रात होत असलेल्या कार्यक्रमात वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या जातात. यामध्ये उपचार पूर्ण करून घरी जाणार्‍या रुग्णांचा सत्कार केला जातो. व्यसनी असले म्हणून काय झाले त्यांनाही सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हीच भावना इथे रुजवली जाते.आत्मबल वाढवण्यासाठी रुग्ण मित्र त्यांच्या आई-वडिलां चे पूजन करून झालेल्या चुकांची क्षमा याचना करतात व इथून पुढे निर्व्यसनी राहण्याचे वचन देतात.त्यानंतर,पत्नीला सोन्याचा घास भरवणे हा कार्यक्रम होतो.

व्यसनाच्या काळात करावयाची कर्तव्य तर राहूनच जातात पण व्यसनामुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त होत असते यामध्ये आई-वडिलांकडे दुर्लक्ष होते, मुलांकडे दुर्लक्ष होते त्यांच्या बद्दलचे कर्तव्य पार पाडायचे राहून जाते. पत्नीला संसारात साथ दिली जात नाही तिच्या हक्काचा वेळ दिला जात नाही कधी कधी त्यांचा अपमान होतो आणि त्यांना त्रासही दिला जातो अशावेळी त्यांची क्षमा मागून आता व्यसनातून बाहेर आल्यानंतर तुम्हाला सन्मानाने वागवेन आपली कर्तव्य पार पाडेन आणि व्यसनमुक्त राहीन अशी ग्वाही ते यावेळेस देतात.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये आयुष व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. संदीप तांबारे यांनी व्यसन म्हणजे काय? व्यसनातून बाहेर आल्यावर काय त्रास होतो? तो त्रास होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले व औषधोपचाराचे महत्त्व सांगितले. त्यांनी आयुष केंद्रामध्ये राबविण्यात येत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती देऊन या केंद्रातून आजपर्यंत सुमारे 30 ते 35 हजार परिवर्तनवादी युवक मित्र व्यसनमुक्त होऊन समाजामध्ये आज ते यशस्वी जीवन जगत आहेत.भारत सरकारने मागच्या 5 वर्षापासून नशामुक्त भारत अभियान सुरू केले आहे.

 

हे अभियान सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यामधील काही तालुक्यामध्ये राबविणेचे कार्य आपण हाती घेतले असून विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त करून यासाठी रोटरी क्लब सारख्या सामाजिक संस्थांनी,संघटनांनी सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी त्यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ.मच्छिंद्र सोनलकर,माजी नगरसेवक दिपकराव चोथे यांनी व्यसनमुक्तीचे काम उत्कृष्ट पद्धतीने चालते याबद्दल समाधान व्यक्त केले.तर कांही परिवर्तनवादी मित्रांनी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी केंद्रामध्ये उपचार घेऊन आनंदाने घरी परतणार्‍या कांही परिवर्तनवादी मित्रांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आलेनंतर उपचार पूर्ण करून जाणार्‍या परिवर्तनवादी मित्रांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांचे स्वागत मॅनेजर गणेश तांबारे,सागर शिंदे,स्वप्नील जाधव,सौ.सिंधू शिनगारे,सौ.अश्विनी कुंभार यांनी केले. सुत्रसंचालन सौ.मृणालिनी मोरे मॅडम यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रोहित गोरे, प्रशांत शेंडगे, मनिषा गोरे, सुजीत ढेकळे, बोरा मॅडम यांनी परिश्रम घेतले केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button