सांगोल्यातील महिलेचा गृह उद्योगात झेंडा…

हम भी कुछ कम नहि…हे आताच्या महिला समाजाला दाखवून देवु लागल्या आहेत…पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कदचित त्याही पुढे जावुन आजच्या महिला अर्थार्जन करत आहेत..आजकाल पुरुषाना सरकारी नोकरीची शाश्वती नाही…खाजगी नोकरीत राम नाही,त्यामुळे बर्याच कुटंबातील व्यक्तीनी नोकरीस लाथ मारुन उद्योग- व्यवसायात उडी घेतली आहे…
सांगोला शहरातील श्रीकांत हसबनिस व वर्षा हसबनिस हे एक असेच धडपडणारे दाम्पत्य…श्रीकांत यानी पदवी पर्यंत शिक्षण घेतल्या नंतर किराणा व्यवसायासारखे छोटे मोठे व्यवसाय करुन पाहिले…मात्र कष्टाचे मानाने प्राप्ती कमी असल्याने त्यानी स्वतःचा उद्योग सुरु करण्याचे ठरवले व त्या नुसार सन 2007 साली अम्बिका महिला गृह उद्योगाची मुहर्तमेढ रोवली गेली..घरच्या घरी शेंगादाणे,फुटाणे,दाळे हे पदार्थ आणून छोटी पैक बनवून दुकानात विकायला सुरुवात केली.त्यास जोड म्हणून सांगली येथील भोरे भडंग विक्री सुरु ठेवली..असे करत असताना श्रीकांत यानी मित्र अनिल जाधव यांचे मदतिने भागीदारीमध्ये कच्चे नाचणी पापड फ्राय करुन छोट्या पैक द्वारे विक्री सुरु केली..होटेल मध्ये स्नैक्स म्हणून याचा वापर होवू लागला..त्यामुळे मागणी वाढली..विक्री होऊ लागली..खेडी,शहरे याचेकडून मागणी वाढू लागली..
आज याच्या जोडीला भडंग,मकाचिवडा,खारे शेंगदाणे अशा पदार्थांची विक्री सुरु आहे..त्याच बरोबर तीळ चटणी,जवस चटणी,शेंगलाडु,चिवडा अशा पदार्थांची विक्री स्वतः बनवून सुरु केली आहे..अथक प्रयत्न,चिकाटी,पत्नी वर्षा हिची मोलाची साथ व ग्राहकांचा विश्वास या जोरावर व्यवसाय भरभराटीस आला आहे..श्रीकांत हे मार्केटिंगचे कामं पहातात तर वर्षा वहिनी उत्पादन क्षेत्रात सक्रिय आहेत..व्यवस्थापक उज्वला यांचे सहकार्य मोलाचे आहे..सध्या छोटी मोठी पैकीन्ग मशिन असुन कपफिलर मशिन नुकतीच खरेदी केली आहे.
आठ- दहा महिलाना रोजगार उपलब्ध आहे,हे महत्वाचे आहे…सर्वांच्या सहकार्याने व्यवसाय प्रगती पथावर आहे..आमच्या या कार्याची दखल घेवून आपुलकी प्रतिष्ठान सांगोला यानी वर्षा याना यशस्वी उद्योजिका या पुरस्काराने सन्मानित कले आहे..



