maharashtra
पुण्यातील शास्त्रीनगर चौकात शिवशाही बसला भीषण आग
वर्दळीच्या रस्त्यावर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली
पुण्यातीत आज(मंगळवार) आणखी एक आगीची घटना घडली आहे. शहरातली शास्त्रीनगर चौकात एका शिवशाही बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या अगोदर सकाळी एका हॉटेलला आग लागली होती.
सुदैवाने बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. भर ररस्त्यात ही बस पेटल्याने एकच खळबळ उडाली होती आणि रस्त्यावर बघ्यांची गर्दी झाली होती. या आगीत बसचा समोरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे. पुण्यातील अत्यंत रहदारीचा असा हा शास्त्रीनगर परिसर आहे आणि याच परिसरातील रस्त्यावर शिवशाही बसला आग लागली आहे.