सांगोला तालुका
आलेगांव येथील माजी सैनिक आप्पासो. पाटील यांचे दुःखद निधन
सांगोला (प्रतिनिधी):- आप्पासो गुंडोजी पाटील माजी सैनिक राहणार कर्मवीर नगर, सांगोला मूळ गाव आलेगांव ता.सांगोला जिल्हा सोलापूर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे मा. अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे संचालक व सोलापूर जिल्हा प्रा.शिक्षक सोसायटी सोलापूर चे संचालक ग्रंथमिञ गुलाबराव आप्पासो पाटील व ऋषिकेश बुक डिलर चे व्यवस्थापक दत्ताञय पाटील यांचे ते वडील होत.व महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष दिलीप पाटील यांचे चुलते होय त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवस विधी मंगळवार दि 23-1-2024 रोजी आलेगांव येथे सकाळी 7.30 वा आहे असे नातेवाईक यांनी सांगितले..